esakal | अल्पवयीन त्‍यात रस्‍त्‍यांवर दुचाकीची स्‍टंटबाजी 
sakal

बोलून बातमी शोधा

two wheeler stunting on the roads

अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्यास देण्यापूर्वी कुटुंबीयांनी थोडा विचार करावा. मुलाला याबाबतचे पूर्ण ज्ञान आहे किंवा नाही याची पडताळणी करूनच त्याच्याकडे वाहन सुपूर्द करावे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना मिळत नाही, मात्र ते चोरून-लपून वाहन चालविताना याबाबत पालकांनी याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांना असे निदर्शनास आल्यास आम्ही वाहन ताब्यात घेऊन वाहन मालकांवर ती दंडात्मक कारवाई करतो. 
चंद्रकांत सरोदे, पोलिस निरीक्षक, सारंगखेडा पोलिस ठाणे 

अल्पवयीन त्‍यात रस्‍त्‍यांवर दुचाकीची स्‍टंटबाजी 

sakal_logo
By
संजय मिस्तरी

वडाळी (नंदुरबार) : वडाळीसह परिसरात अल्पवयीन मुलामुलींकडून मोटरसायकलसह चार चाकी वाहनांचा वापर अधिक वाढल्याने त्यांच्या चालवण्याचा वेग देखील सुसाट आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्टंटबाजी करणाऱ्या मुलांवर कारवाई करण्यात आली. 

सध्या कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालय बंद आहे अनेक शाळकरी मुलं घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करत असून त्यांचा घरगुतीसह शेती व व्यवसायासाठी हातभार लागत आहे. या ना त्या कारणासाठी मुलांना वस्तू बाजार आणण्यासाठी बाहेर पडावे लागते. त्यासाठी मोटरसायकल सह चारचाकी वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र अनेकांना वाहन चालवण्याचे पूर्ण ज्ञान नसल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटतो यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. अनेक जण वेगवेगळ्या चित्रपटातील मोटर सायकल स्टंट च्या क्लिप आपल्या मोबाईल वरती डाऊनलोड करून त्याचे प्रात्यक्षिकही रस्त्यावर ती करताना दिसतात, यामुळे एखाद्याला जीव गमवावा लागतो. ते स्वतः दुखापती होऊन कायमचे जायबंदी होत आहे सध्या सर्वत्रच रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे त्यातच या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने दररोज अपघातांच्या मालिका सुरूच आहेत 

संध्याकाळी चालते स्टंटबाजी 
दिवसभर घरी थांबून असल्याने संध्याकाळी ते व्यायामाच्या सरावाच्या नावाखाली बाहेर पडतात. सोबत दुचाकी चारचाकी वाहने नेतात त्यात आपल्या मोबाईल मधल्या डाऊन केलेल्या व्हिडिओ क्लिप लावून त्यातून के स्टंटचे प्रशिक्षण घेतात व वेगवेगळ्या रस्त्यावर ठिकाणी जाऊन त्याचे प्रात्यक्षिकही करतात यामुळे शरीराला दुखापती करून घेत आहेत. 

 
जबाबदार पालकांनी अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्यास देऊनच नये. शरीराचा प्रत्येक भाग अमूल्य आहे. अपघातामुळे एखादा भाग कायमस्वरूपी निकामी होतो. यामुळे अपंगत्व येते, प्रसंगी अनेक मुलं जिवास मुकतात. अल्पवयीन मुलांना अशा प्रकारापासून रोखणे गरजेचे आहे यासाठी जनजागृतीची गरज आहे. 
-डॉ. विजय मोहने, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळी 

संपादन ः राजेश सोनवणे