नंदुरबारला दोन तासातच आटोपले मतदान 

धनराज माळी
Tuesday, 1 December 2020

मतदान केंद्राबाहेर उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मागर्दशनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रात कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास मनाई होती.

नंदुरबार ः विधानपरिषद निवडणूकीचे नंदूरबार मधील तहसील कायार्लयाती मतदान केंद्रात सकाळी आठ ते दहा या दोन तासात एकही मतदान झाले नव्हते. मात्र त्यानंतर महाआघाडीच्या मतदारांनी एकत्रित येत मतदानासाठी रांग लावली दुपारी १२ ते २ या वेळेत ५५ पैकी ५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

आवश्य वाचा- ढोर बाजारात विक्रीसाठी आली आणि गायीने आश्चर्यकारक अशी लाखात एक घटना घडवली -

सकाळी आठपासून येथील मतदान केंद्रात कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरूवात झाली. महाआघाडीतफेर् माजी नगरध्यक्ष कुणाल वसावे, दीपक दीघे तर भाजपतफेर् नगरसेवक चारूद्त कळवणकर, आनंद माळी हे बुथ प्रमुख होते. महाआघाडीच्या नगरसेवक, नगराध्यक्षा, जि.प सदस्य आदींनी एकत्रितपणे सकाळी अकराला मतदान केंद्रावर येऊन मतदान प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर दुपारी साडेबाराला भाजपच्या मतदांना एकत्रित आणण्यात आले.

मतदान केंद्राबाहेर बंदोबस्त

मतदान केंद्राबाहेर उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मागर्दशनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रात कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास मनाई होती. प्रवेशदवाराजवळ तपासणी करूनच मतदान केंद्राकडे प्रवेश दिला गेला. तसेच प्रवशद्वारावर आक्सीमीटरने प्रत्येकाची तपासणी, सॅनटायझरींग करून पुढे फिजिकल डस्टन्सिगचा केलेल्यागोलवर रांगेत उभे करून मतदानासाठी प्रवेश देण्यात आला.यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही भेट देऊन पाहणी केली.एकूण ५५ मतदार होते. त्यापैकी एक नगरसेवक बाहेरगावी गेल्याने ५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar voting in nandurbar legislative council elections was completed in two hours