esakal | केरळला फिरण्यास नेत खोलीत डांबत अत्याचार 
sakal

बोलून बातमी शोधा

wife atyachar

नंदुरबार माहेर असलेल्या त्या विवाहीतेचा विवाह पुणे येथील संदीप नाथा मन्वरे यांच्याशी 2016 मध्ये झाला होता. लग्नाला तीन वर्ष झाले असताना देखील विवाहात मानपान दिला नाही; म्हणून वाईट वागणूक दिली जात होती.

केरळला फिरण्यास नेत खोलीत डांबत अत्याचार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला केरळ येथे फिरण्यास नेवून तेथे खोलीत डांबून ठेवले. इतकेच नाही तर त्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्‍की पहा - "जातीबाहेर' असल्याचे सांगत मुलास लग्नमंडपातून हकलले 

 
नंदुरबार माहेर असलेल्या त्या विवाहीतेचा विवाह पुणे येथील संदीप नाथा मन्वरे यांच्याशी 2016 मध्ये झाला होता. लग्नाला तीन वर्ष झाले असताना देखील विवाहात मानपान दिला नाही; म्हणून वाईट वागणूक दिली जात होती. तसेच वारंवार चारित्र्यावर संशय घेतला जात होता. घरात असलेले शिळे अन्न खाण्यास दिले जात होते. अशा तक्रारी विवाहितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या आहेत. 

खोलीत डांबले अन्‌ 
केरळ येथे फिरण्यास गेले असता तेथे खोलीत डांबून ठेवले जात होते. शिवाय तिला अनैसर्गिक कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते. लग्न झाल्यापासून पती तसेच सासरच्या मंडळींनी चार वर्षात नाशिक, पुणे व मुंबई येथे केलेल्या अत्याचाराला कंटाळून विवाहितेने नंदुरबार उपनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी संदीप नाथा मन्वरे, नाथा शंकर मन्वरे, रंजना नाथा मन्वरे, योगेश नाथा मन्वरे, शिल्पा मन्वरे व संतोष मन्वरे, शिल्पा मन्वरे (सर्व रा.पुणे) यांच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक भापकर करीत आहे.