कर्करोग झालेल्या बैलाच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

खंडु मोरे
रविवार, 11 मार्च 2018

शेतकरी व बैल हे फार जीवाभावाचे नाते असून आज बैलाच्या किमती लाखाच्या पुढे झाल्याने बैलजोडी घेण व सांभाळण शेतकर्यांना जिकरीचे झालं आहे,सर्वसाधारपणे बैलांना शिंग,डोळे,अन्न नलिका,खांद्याला गाठी होत कर्करोगाची शक्यता अधिक असल्याने ह्या संबंधी आजाराची लक्षणे दिसताच महागडे जनावर उपचार करून घ्यावीत.
- डॉ. बळीराम देशमुख, पशुधन विकास अधिकारी

खामखेडा (नाशिक) : विसापूर (ता. कळवण) येथील शेतकरी योगेश गुंजाळ यांच्या खिल्लारी जातीच्या बैलाच्या डोळ्याला झालेल्या कर्करोगावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात पशुधन विकास अधिकारी डॉ. बळीराम देशमुख व पर्यवेक्षक डॉ. विलास आहिरराव यांना यश आले असून या यशस्वी शस्रक्रियेमुळे शेतकरी योगेश गुंजाळ यांचा बैल पुन्हा शेतीकामासाठी उपयोगात आल्याने या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले.

विसापूर येथील शेतकरी योगेश गुंजाळ यांनी वर्षापूर्वी एक लाख चाळीस हजार रुपये देऊनखिल्लारी बैलजोडी घेतलेली होती. काही दिवसांपासून एका बैलाच्या डोळ्यातून पाणी वाहत होते व डोळा पूर्णतः लाल झाला. त्यानंतर बैलाच्या डोळ्यात लहान गाठी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाठीमुळे डोळयातील बुबळ बाजुला जाऊ लागला.डोळ्यात जखम होऊन रक्तस्राव होऊ लागल्याने बैलाला त्या डोळ्यास दिसणे बंद झाल्याने गुंजाळ यांनी पशुधन पर्वेक्षक डॉ विलास आहिरराव यांना उपचारासाठी बोलावले.

बैलाच्या डोळ्यात पल्स तयार होत.संपूर्ण बुबुळे पांढरे झाले.डोळ्यास कर्क रोगाची लागण झाल्याचे सांगत त्यावर शस्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.पशुधन विकास अधिकारी डॉ.बळीराम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैलाच्या डोळ्यावर शस्रक्रिया करत डोळ्यातील गाठी काढून डोळा पूर्ववत मोकळा केला.

एक तास सुरु असलेल्या बैलाच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया या पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दोन दिवसानंतर बैलाला चांगल दिसू लागल्याने व शेतकऱ्याचा बैल हि शेतीत राबण्यास योग्य झाला असल्याने शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकरी व बैल हे फार जीवाभावाचे नाते असून आज बैलाच्या किमती लाखाच्या पुढे झाल्याने बैलजोडी घेण व सांभाळण शेतकर्यांना जिकरीचे झालं आहे,सर्वसाधारपणे बैलांना शिंग,डोळे,अन्न नलिका,खांद्याला गाठी होत कर्करोगाची शक्यता अधिक असल्याने ह्या संबंधी आजाराची लक्षणे दिसताच महागडे जनावर उपचार करून घ्यावीत.
- डॉ. बळीराम देशमुख, पशुधन विकास अधिकारी

Web Title: Marathi news Nashik news animal cancer