आदिवासी विभागाच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार 

प्रदिप पाटील
Friday, 20 November 2020

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून संमती घेण्यात येणार आहे. २३ ते २९ नोव्हेंबरदरम्यान शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची कोरोनासाठी आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. 

नवलनगर ः आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, एकलव्य निवासी शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू होणार आहेत.

वाचा- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कला उत्सव -

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून संमती घेण्यात येणार आहे. २३ ते २९ नोव्हेंबरदरम्यान शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची कोरोनासाठी आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. 

अशा आहेत मार्गदर्शक सूचना 
कार्यगट गठीत करणे, शाळा व वसतिगृहात स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे. शारीरिक अंतर राखत शाळेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, निवासव्यवस्थेचे नियोजन करणे. मास्‍कचा वापर करणे, येण्या- जाण्याचे मार्ग, पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याची जागा, स्वच्छतागृहात विशिष्ट चिन्हांचा वापर करून खोल्या व परिसर नियमित स्वच्छ करण्यावर भर दिला जाणे गरजेचे आहे. ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी उपस्थित राहतील. वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा जास्त राहणार नाही. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात येणार आहेत. गर्दी होईल अशा कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. निवासी रूममध्ये दोन विद्यार्थ्यांची कमाल मर्यादा लक्षात घेत व्यवस्था करण्यास सांगितले आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navalnagar tribal schools will be started by one december