
आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात या बांधवांसाठी आरक्षण दिलेच पाहिजे पण त्यासाठी वेगळी तरतूद करावी.
नवापूर : प्रत्यक्ष ओबीसी 52 टक्के समाज असताना सुद्धा त्यांना 19 टक्के आरक्षण मिळाले आहे. या आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे. मराठा आरक्षण दिलेच पाहिजे पण त्यासाठी वेगळी तरतूद करावी. ही तरतूद करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. 18 पगड जाती असलेला ओबीसी बांधवांना आरक्षणापासून वंचित करू नये असे निर्देशन करत ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेने तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले.
वाचा- लिंबाच्या शेतात सुरू होता पत्यांचा डाव, पोलिसांची धाड पडताच अंधारात सुरू झाली पळापळ
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची तालुकास्तरीय सर्वपक्षीय, सर्वजातीय बैठक झाली होती. नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक नितीन शेलार समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर माळी यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच बैठक झाली होती. या प्रसंगी कोविड-19 चे सर्व नियमांचे पालन करून शांततेत कुठल्याही नियमाचा भंग न करता तहसील कार्यालयाच्या समोर आरक्षणासंदर्भात घोषणा दिल्या. ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिका प्रा. डॉ.नितीनकुमार माळी यांनी मांडली. यात ओबीसी आरक्षणात कोणत्याही जातींचा समावेश करू नये, कारण त्यात प्रत्यक्ष ओबीसी 52 टक्के समाज असताना सुद्धा त्यांना 19 टक्के आरक्षण मिळाले आहे.
या आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात या बांधवांसाठी आरक्षण दिलेच पाहिजे पण त्यासाठी वेगळी तरतूद करावी. परंतु ही तरतूद करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. 18 पगड जाती असलेला ओबीसी बांधव याला आरक्षणापासून वंचित करू नये यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. या मागण्यांसाठी नवापूर शहर तसेच नवापूर तालुक्यातील ओबीसी अंतर्गत सर्व समाजातील बांधवांनी तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे