सोलापूरहुन आलेले ११ लोकांना नवापूरला क्वारोंटाइन, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी असल्याने गावात किंवा शहरात कोणीही नवीन व्यक्ती आला तर संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती मिळते. १ एप्रिल ला रात्री अकराच्या सुमारास सोलापूर हुन दोन वाहने शहरात येत असल्याची माहिती मिळाली.

नवापूर : सोलापूर येथून जमात मधून परत आलेल्या ९ जण आणि त्यांच्या सोबत असलेले दोन वाहन चालक असे अकरा लोकांना क्वारोंटाइन कक्षेत ठेवण्यात आले. प्राथमिक तपासणीत कुणालाही कोरोना व्हायरसची लक्षणे नाहीत. संचारबंदी तोडल्याने त्यांच्यावर आरोग्य विभागाने गुन्हा दाखल केला असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली. या लोकांना गावाबाहेरच ताब्यात घेतल्याने त्यांच्या पासून होणारा प्रसाराचा धोका टळला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी असल्याने गावात किंवा शहरात कोणीही नवीन व्यक्ती आला तर संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती मिळते. १ एप्रिल ला रात्री अकराच्या सुमारास सोलापूर हुन दोन वाहने शहरात येत असल्याची माहिती मिळाली. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी तालुका आरोग्य विभाग यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी यांच्या मदतीने सदर वाहनांना गावाच्या प्रवेशद्वारावर अडवले. सर्वांची आरोग्य विभागाने तपासणी केली. सद्या कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नसली तरी त्यांना खबरदारी म्हणून क्वारोंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. लक्षणे नसली तरीही खबरदारी आवश्यक आहे. म्हणून त्यांना प्रशासनाने तयार केलेल्या क्वारोंटाइन कक्षात ठेवले आहे. 

सदर नऊ जण आणि त्यांचे दोन वाहन चालक हे सोलापूर येथे जमात निमित्त गेले होते. सोलापूर येथे निजामोद्दीन येथून काही जण जमात मध्ये सहभागी झाले असतील याची शंका आहे. देशात कोरोना विषाणू बाबत जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी लागेल. संचारबंदी चा नियम तोडल्याने गुन्हा दाखल झाल्याची ही पहिली घटना तालुक्यात घडली आहे. 

होम्स क्वारोंटाइन 
नवापूर तालुक्यात आज अखेर (१६००) सोळाशे लोकांना होम्स क्वारोंटाइन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडक सीमा सील करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या ची संख्या आता कमी झाली आहे. सुदैवाने अद्याप तरी कोणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. 

एक संशयित 
नवापूर शहरातून एका व्यक्तीचे घशातील द्रव लॅब मध्ये तपासणी साठी पाठवले आहेत. सदर व्यक्ती पुण्याहून आलेला आहे. त्याला कोरोनाचे लक्षणे दिसून आल्याने प्रशासनाने त्याची आरोग्य तपासणी केली. त्याच्या घशातील आवश्यक द्रवाचा नमुना तपासणी करता पाठविण्यात आला आहे. सदर व्यक्ती नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या फोन महिला, एक पुरुष व दोन मुलांना येथेच होम क्वारोंटाइन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur city solapur elevan people home quarantine and fir