esakal | नवापूरच्या सर्व सीमा, रस्ते बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

navapur

घरात राहून आपण कोरोनाला हरवू शकतो. नियम पाळा, प्रशासनाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका असेही त्यांनी बजावले. 

नवापूरच्या सर्व सीमा, रस्ते बंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवापूर : गुजरातमधून येणारे मजूर तालुक्याची डोकेदुखी ठरली आहे. त्यांनी आहेत तेथेच थांबावे असे आवाहन करीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी आता तालुक्यात येणारे सर्व रस्ते बंद केले जात आहेत. गावागावातील लोकांची त्यासाठी मदत घेण्यात येईल. शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल असे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आढावा बैठकीत सांगितले. 


नक्‍की पहा - जळगाव शहरात खुल्या मैदानांवर भरणार फळ-भाजी बाजार ! 

पालिका सभागृहात झालेल्या या बैठकीस सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. नाईक म्हणाले,‘ तहसीलदारांनी रेशन दुकानदारांना सूचना कराव्यात, प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळेल कोणीही मनमानी कारभार करणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातही प्रभाग कमिटी तयार करून प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची माहिती उपलब्ध करा. तालुक्यातील सीमेवर कडक बंदोबस्ताची आवश्यकता असल्याने आज नवापूर तालुक्यात येणाऱ्या सर्व सीमा बंदी करण्यात येणार आहेत. परराज्यातून येणारे काही लोक छुप्या मार्गेने प्रवेश करीत आहे. त्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करणे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कोणीही आपल्या गावात प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी. सीमावर्ती भागातून कुणीही जिल्ह्यात घुसखोरी करणार नाही याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी असेही आमदारांनी सांगितले. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी पालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या सुविधांची माहिती दिली. 

शहरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येईल. चाळीस ते पन्नास जणांना परिचारिकांची प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांच्या मार्फत शहरातील नागरिकांची तपासणी होईल. २५५ आरोग्य पथक तालुक्यात कार्यरत आहेत. ते आपल्या कार्यात सतर्कता पाळत आहेत. ग्रामसुरक्षा दल सक्रिय झाली आहेत, सरपंच, पोलिस पाटील व लोकप्रतिनिधीही सक्रिय आहेत. शहरात प्रभाग निहाय जागरूकता आवश्यक आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.