esakal |  coronavirus : नवापूरला पाच परिवारांतील 17 जण कोरोना संशयित! 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona suspects

वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात तयार केलेल्या "क्वारंटाइन विभागा'त निगराणीत ठेवण्यात आले आहे. खातगाव येथील सहा जणांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

 coronavirus : नवापूरला पाच परिवारांतील 17 जण कोरोना संशयित! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवापूर  : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात "क्वारंटाइन विभाग' तयार करण्यात आला आहे. या विभागात आज परदेशातून आलेल्या संशयित पाच परिवारांतील सतरा जणांना ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात येणार असून, त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. चौदा दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत, तर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल. मात्र, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रशासन घरी पाठविण्याच्या तयारीत आहे. 

पायरविहीर (ता. नवापूर) येथे ओमान येथून आलेल्या गुजराती व्यक्तीला व त्याच्या परिवारातील पाच, असे सहा जण; ओमानचे विलासभाई दाजूभाई गामित यांच्या संपर्कात आलेले मनोहर मधू गावित, बिबलीबाई मधू गावित, मधू बोदल्या गावित, सुसाना विलास गावित; 
युक्रेनमधून 13 मार्चला आलेल्या यश रमेश परदेशीसह परिवारातील तीन जण; दुबईमधून 16 मार्चला आलेल्या कल्पना नारायण सोनार परिवारातील पती आणि मुलगा; रशियामधून 22 मार्चला आलेल्या देवयानी आनंदराव अहिरेसह परिवारातील तीन जण; आई, भाऊ व वडील अशा सतरा जणांना  मंगळवारी वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात तयार केलेल्या "क्वारंटाइन विभागा'त निगराणीत ठेवण्यात आले आहे. खातगाव येथील सहा जणांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

आज या लोकांना कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसली, तरी परिस्थितीचे गांभीर्य पाहता तहसीलदार घरी सोडण्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? राज्यात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ओमानमधून आलेला गावित व त्याच्या परिवाराच्या पाच सदस्यांसह नवापूर येथील तीन परिवारांना क्वारंटाइन केले आहे. नवापूर तालुक्‍यातील या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या घरात बाहेरून कोणी पाहुणा आला असेल, तर त्यांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी, असे सांगण्यात येत आहे. 

कोरोनाची काही लक्षणे दिसून आल्यानंतर घशातील द्रवाचे नमुने घेऊन पुण्यात तपासणी केली जाईल. जर लक्षणे दिसून आली नाहीत, तर 14 दिवसांची कोरोना होम क्वारंटाइन काढून परिवाराची सुटका करण्यात येईल. 
- नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नवापूर 
 

loading image