esakal | विसरवाडीची पहिली ई - महिला ग्रामसभा झाली 
sakal

बोलून बातमी शोधा

विसरवाडीची पहिली ई - महिला ग्रामसभा झाली 

महिलांना शासकीय योजना आणि त्या संदर्भातील महिलांच्या जवाबदाऱ्यां त्या सोबतच महिलांचा ग्रामपंचायत मधील सहभाग यावर मार्गदर्शन केले.

विसरवाडीची पहिली ई - महिला ग्रामसभा झाली 

sakal_logo
By
विनायक सुर्यवंशी

नवापूर  : विसरवाडी (ता. नवापूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत जिल्ह्यातील पहिली ई - महिला सभा स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टला झाली. ई- सभेत दीडशे पेक्षा जास्त महिलां सहभागी झाल्या. ग्रामविकासात महिलांचा सहभाग यावर विशेष चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
     
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिलासभा ही नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने झाली.

महिलांना शासकीय योजना आणि त्या संदर्भातील महिलांच्या जवाबदाऱ्यां त्या सोबतच महिलांचा ग्रामपंचायत मधील सहभाग यावर मार्गदर्शन केले. मनरेगा लेबर बजेट कसे बनवतात याबाबत सुध्दा मार्गदर्शन केले. महिलांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले.

ई- सभेत सार्वजनिक शौचालय, रस्ते, गटार व्यवस्था, बैठक हॉल यासह 
ग्रामविकासाच्या बाबत अनेक महत्वाचे मुद्दे महिलांनी उपस्थित केले. 

सदर सभेच्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे यांनी सभेचे विषऑनलाईन महिलासभेच्या प्रसंगी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, यांनी उपस्थित महिय स्पष्ट केले. ग्रामपंचायत विकास आराखड्यातील कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. महिलांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थीत केले. त्यास ग्रामसेवक कैलास सोनवणे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन काळात केलेले कार्य आणि लोकांनी दिलेला सहभाग, काम करताना येणाऱ्या अडचणी याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम यांनी सहभागी महिलांशी चर्चा केली. CYDA चे क्षमता बांधणी समन्वयक मंगेश निकम यांनी शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्ती आणि महिलांनी घ्यावयाचा सहभाग यावर मार्गदर्शन केले.

तहसीलदार सुनीता जऱ्हाड यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर सभा आयोजित करण्यासाठी नवापूर पंचायत समिती आणि पुणे येथील सेंट्रर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीस संस्था यांनी विशेष मेहनत  घेतली. सदर सभे करीता दीडशे पेक्षा  अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.

ई- महिला सभा प्रसंगी विस्तार अधिकारी श्री कुवर, विसरवाडी सरपंच बकाराम गावित, उपसरपंच उर्वशी अग्रवाल, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश गावित, CYDA चे  प्रकल्प समन्वयकअमोल शेवाळे, सुनीता गावित(CRP), आशा वर्कर अंजना गावित, मनीषा वाघ यांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवला आणि मार्गदर्शन केले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे