esakal | मुंगसरामध्ये मुंगसांचा वावर मोठा 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

मुंगसरामध्ये मुंगसांचा वावर मोठा 

sakal_logo
By
आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा

 नाशिक ः नाशिकपासून जवळ असलेल्या आणि आळंदी नदीकाठावरील तीन हजार लोकवस्तीचे गाव मुंगसरा. येथे मुंगसांचा वावर अधिक असल्याने गावाची ओळख मुंगसरा अशी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिरासमोरील 70 किलोचा गोलाकार दगडी गोळा उचलण्यासाठी तरुणांची गर्दी होते. हा दगडी गोळा खांद्यावर घेऊन मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करणारा तरुण "फीट' मानला जातो. 

गावामध्ये दक्षिणमुखी हनुमान, पचीतराया, सारंदरबाबा, मरिआईमाता, म्हसोबा आदी मंदिरे आहेत. होलिकात्सव मोठ्या उत्साहात केला जातो. भजनी मंडळ रोज हरिपाठाचे पारायण करते. शाहीर शरद गोळेकर आणि गायक एकनाथ भोर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. विष्णू वायचळे यांनी वाघे कला जोपासली आहे. गावात दहा ते बारा दोन मजली माड्या आहेत. बागायती गाव म्हणून प्रसिद्ध असून, गावची जलालपूर पाणीयोजना अपयशी ठरल्याने "बोअरवेल'ने पाणी पुरविले जाते. गावात दोन अंगणवाड्या आणि व्यायामशाळा आहे. रोइंगमध्ये पुष्पा फडोळने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. गावाला संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. मरिआईमाता मंदिर नदीकाठावर असून, इथे नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करण्यासाठी तरुणांचा अभ्यास सुरू आहे. अनेक मुलांना खेळात नाव मिळवले. 
... 
गावातील दक्षिणमुखी हनुमान मूर्ती असून, दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक येतात. तसेच गावातील माड्या अभ्यासण्यासाठी अभ्यासकांची रीघ लागलेली असते. भविष्यात गावात सौरऊर्जा आणि पाणीयोजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
-कल्पना भोर, सरपंच 

गावामधील मंदिरांचे बांधकाम झालेले नाही. वृक्षाच्या छायाखालील मंदिरांचे बांधकाम व्हावे. तसेच शेतकऱ्यांसाठी विविध पिकांची माहिती व्हावी, यासाठी कार्यशाळा होणे आवश्‍यक आहे. 
-लक्ष्मण कडाळे, शेतकरी 
 

loading image
go to top