लासलगांव बाजार समितीत कांद्यात तेराशे रूपयांची घसरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

लासलगाव :- बाजार समितीत गुरूवारच्या तुलनेत शनिवारी तेराशे रुपयाची मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहे. उन्हाळ कांद्याच्या पाठोपाठ लाल कांद्याला ही चांगला बाजारभाव मिळत होता आता कांद्याच्या बाजारभावात घसरण होण्याची सुरुवात झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे 

लासलगाव :- बाजार समितीत गुरूवारच्या तुलनेत शनिवारी तेराशे रुपयाची मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहे. उन्हाळ कांद्याच्या पाठोपाठ लाल कांद्याला ही चांगला बाजारभाव मिळत होता आता कांद्याच्या बाजारभावात घसरण होण्याची सुरुवात झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे 

केंद्र सरकारने वाढते कांद्याचे बाजारभाव पाहता इजिप्त आणि तुर्की या देशातून कांदा मोठ्या प्रमाणात आयात करण्याचा निर्णय घेतला त्यातच आता वातावरण मोकळे झाल्याने देशांतर्गत राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश कर्नाटक तर गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातूनही कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने तसेच केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा आणल्याने लाल कांद्याच्या बाजारभावात लासलगाव बाजार समितीसह नासिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव घसरण होत असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप सांगत आहे 

घसरणमुळे ग्राहकांमध्ये उत्साह

लासलगाव तेराशे रुपयाची प्रति क्विंटल मागे उच्चांकी दरात घसरण शुक्रवारच्या तुलनेत आज शनिवारी पाहायला मिळाली जास्तीत जास्त 8701 रुपये सरासरी 7100 रुपये तर कमीत कमी 2500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला तर गुरुवारी जास्तीत जास्त 10,012 रुपये सरासरी 7100 रुपये तर कमीत कमी 2500 रुपये इतका बाजार भाव मिळाला होता

नक्की वाचा...सेव्ह द चिल्ड्रेन उपक्रमांसाठी 40 शाळांची निवड

चढउताराकडे साऱ्याचेच लक्ष
गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भावांचा उच्चांक आपल्याला पहायला मिळत आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे दिवसेदिवसे वाढतच आहे. सामान्यांच्या आवाक्यात कांदा येईल की नाही हे हे सध्या तरी कुणी सांगू शकत नाही. पण अचानक आज लासलगावला कांद्याच्या दरात तेराशे रूपयांनी घसरण झाली आणि कांदा पुढील काळात आवाक्यात येईल असे वाटू लागल्याने ग्राहकांनी सावध भूमिका स्विकारली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news onion market in lasalgaon market