बाप रे.... आता सेंद्रिय शेतमालावरही गंडातर!

residentional photo
residentional photo

.. 
नाशिक  सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचे राज्य म्हणून सिक्कीमने आपले स्थान अधोरेखित केलेले असताना विषमुक्त फळे अन्‌ भाजीपाल्याचे राज्य म्हणून महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षी अपेडाच्या "हॉर्टिनेट'च्या माध्यमातून राज्यात 60 हजार हेक्‍टरची नोंदणी झाली होती. ती यंदा दोन लाख हेक्‍टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले होते. पण अवकाळी पावसाने फळबागा आणि भाजीपाल्याला तडाखा दिल्याने या प्रयत्नात खोडा घातला. 

विषमुक्त फळे अन्‌ भाजीपाल्याचे राज्य अशी ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने दोन वर्षांचे ध्येय निश्‍चित केले. यंदाच्या हंगामात नोंदणीचे क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना द्राक्ष, डाळिंब फळबागांप्रमाणेच भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने प्रयत्नांना काळी टीक लागली. आतापर्यंत सर्वसाधारणपणे बारा हजारांहून अधिक हेक्‍टरची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात द्राक्षांच्या 287 हेक्‍टरचा समावेश आहे.

नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील 186 हेक्‍टर बागांचे नूतनीकरण झाले आहे, तर नव्याने 101 हेक्‍टरची नोंदणी केली आहे. याशिवाय नगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जालना, नागपूर, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, वाशिम, वर्धा जिल्ह्यांतील 276 हेक्‍टर बागांचे नूतनीकरण करत शेतकऱ्यांनी नव्याने एक हजार 376 हेक्‍टरची नोंदणी केली. नगर, औरंगाबाद, बुलडाणा, गोंदिया, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, सोलापूर, ठाणे जिल्ह्यांतील आंब्यांच्या बागांचे नूतनीकरण करत नव्याने नोंदणी केली. रत्नागिरीमध्ये तीन हजार 399 हेक्‍टरचे नूतनीकरण, एक हजार 456 हेक्‍टरची नवीन नोंदणी, रायगडमध्ये 363 हेक्‍टरचे नूतनीकरण, 662 हेक्‍टरची नवी नोंदणी, तर सिंधुदुर्गमध्ये एक हजार 365 हेक्‍टरचे नूतनीकरण आणि 751 हेक्‍टरची नवीन नोंदणी अशी एकूण राज्यात पाच हजार 281 हेक्‍टरवरील आंब्यांच्या बागांच्या नोंदणीचे नूतनीकरण व तीन हजार 566 हेक्‍टर बागांची नव्याने नोंदणी झाली. गेल्या वर्षी 43 हजार हेक्‍टर द्राक्षे, अडीच हजार हेक्‍टर डाळिंब, दहा हजार हेक्‍टर आंब्यांच्या बागांची नोंदणी "हॉर्टिनेट'वर झाली होती. भाजीपाल्याचे गेल्या वर्षी दोन हजार 200 हेक्‍टर क्षेत्र नोंदवले गेले होते. आतापर्यंत कारले, दुधीभोपळा, शेवगा, चवळीच्या शेंगा, हिरवी मिरची, भेंडी, बटाट्याच्या एक हजार 631 हेक्‍टरची नोंद झाली. 

आठवडाभरानंतर पुन्हा अभियान 
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागांसह क्षेत्राच्या नोंदणीकडील लक्ष पूर्णपणे हटवले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांपर्यंत आठवडाभरानंतर कृषी विभागाची यंत्रणा पुन्हा पोचणार असून, नोंदणीचे अभियान सुरू करणार आहे. नोंदणीसाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे. अधिकारी क्षेत्राची नोंदणी करून घेत नाहीत, अशा तक्रारीसुद्धा शेतकऱ्यांकडून वरिष्ठांपर्यंत धडकल्या असून, क्षेत्राची नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरापर्यंत देण्यात आल्या आहेत. नोंदणीनंतर कृषी विभागाची यंत्रणा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रत्यक्ष किती मालाची निर्यात होऊ शकेल, याचा अंदाज घेणार आहे. देशाचा विचार करता, "हॉर्टिनेट'च्या माध्यमातून नोंदणीत महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. 
 

.नोंदणीचा फायदाच 

अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने होणाऱ्या पंचनाम्याला "हॉर्टिनेट'वरील नोंदणीमुळे काही तोटा होईल काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. पण प्रत्यक्षात नुकसानीतून वाचलेली फळबागा आणि भाजीपाल्याच्या क्षेत्राची नोंदणी केल्याने तोटा होण्याचे कारण नाही. नोंदणीचा फायदा जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांप्रमाणेच विषमुक्त फळे-भाजीपाला याची ओळख देशांतर्गत घरगुती ग्राहकांना होऊ शकणार आहे. शिवाय "अपेडा'च्या क्‍लस्टर आणि स्मार्ट योजनेतही नोंदणी जमेची बाजू असेल. 
- गोविंद हांडे, कृषिमाल निर्याततज्ज्ञ, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com