नाशिक पंचायत सभापतीपदी विजया कांडेकर, उपसभापतीपदी ढवळू फसाळे बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

नाशिक ः नाशिक पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीने आपल्याकडे कायम ठेवली. सभापतीपदी विजया विलास कांडेकर, तर उपसभापतीपदी ढवळू गोपाळा फसाळे यांची आज बिनविरोध निवड झाली. मावळते सभापती रत्नाकर चुंभळे यांच्यावरील अविश्‍वास नाट्य आणि गोवर्धन गटातील पक्षाच्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडीच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये वादविवाद झाला. अखेर उपसभापतीपदाचा कालावधी तिघांमध्ये विभागून देण्यासाठी चिठ्ठ्या काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नाशिक ः नाशिक पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीने आपल्याकडे कायम ठेवली. सभापतीपदी विजया विलास कांडेकर, तर उपसभापतीपदी ढवळू गोपाळा फसाळे यांची आज बिनविरोध निवड झाली. मावळते सभापती रत्नाकर चुंभळे यांच्यावरील अविश्‍वास नाट्य आणि गोवर्धन गटातील पक्षाच्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडीच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये वादविवाद झाला. अखेर उपसभापतीपदाचा कालावधी तिघांमध्ये विभागून देण्यासाठी चिठ्ठ्या काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तहसिलदार अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. एकुण आठपैकी पाच सदस्य राष्ट्रवादीचे, दोन शिवसेनेचे, एक अपक्ष असे बलाबल सभागृहात आहे. उपसभापतीपदासाठी इगतपुरीचे कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप थेटे यांनी श्री. फसाळे यांचे नाव लावून धरले होते. मात्र त्यास राष्ट्रवादीमधून विरोध झाला. मात्र सभापतीपदासाठी सौ. कांडेकर यांचे नाव अंतीम झाले.

नक्की वाचा-उच्चशिक्षित दिपेशने साकारले वडिलांचे स्वप्न

   उपसभापतीपदासाठी पक्षामध्ये चर्चा झाली. माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी श्री. फसाळे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाचे काम केल्याचे नमूद केले. त्यानुसार आगामी अडीच वर्षाचा कालावधी श्री. फसाळे, राष्ट्रवादीच्या छाया डंबाळे, शिवसेनेच्या उज्वला जाधव, अपक्ष विजय जगताप यांच्यात विभागून देण्याचे ठरले. दरम्यान, अखेरच्या सहा महिन्यात उज्वला जाधव यांना सभापतीपदाची संधी मिळाल्यास शिवसेनेचे डॉ. मंगेश सोनवणे यांना उपसभापतीपदाची संधी मिळू शकते, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. 

5 वर्षानंतर पूर्वविभागाला सभापतीपद 
कॉंग्रेसचे तत्कालिन सभापती अनिल ढिकले यांच्या 2012 ते 2014 या कालावधीनंतर पूर्व विभागाला सौ. कांडेकर यांच्या रुपाने पाच वर्षानंतर सभापतीपद मिळाले. तसेच राष्ट्रवादीने श्री. फसाळे यांच्या रुपाने आदिवासी भागाला प्रतिनिधित्व दिले. हे सगळे एकीकडे राजकारण घडत असताना मात्र ग्रामविकासात सत्ताकारणासाठी पुढे सरसावलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा फारसा प्रभाव या निवडणुकीत पाह्यला मिळाला नाही. सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे श्री. दौंडे यांनी जाहीर केल्यावर श्री. खोसकर, श्री. पिंगळे, श्री. थेटे, विष्णूपंत म्हैसधुणे, अर्जून टिळे, सचिन पिंगळे, कॉंग्रेसचे संपत सकाळे, संजय तुंगार आदींनी दोघांचे अभिनंदन केले. फटाक्‍यांची आतषबाजी करत समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. 

नंतर स्नुषा सभापती 
सौ. कांडेकर यांचे सासरे निवृत्ती दामू कांडेकर हे 1992 ते 1997 या कालावधीत सभापती होते. मुळच्या लाखलगावच्या रहिवाशी असलेल्या सौ. कांडेकर यांचे माहेर जऊळके वणी येथील आहे. त्यांचे पती विलास कांडेकर यांनी लाखलगाव विकास सोसायटीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा थोरला मुलगा प्रथमेश बारावी झाला असून "नीट'ची तयारी करत आहे. दुसरा मुलगा आदित्य सातवीमध्ये शिकतो आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news panchyat samiti sabhpati selection