जनता कर्फ्यु : भुकेने व्याकुळ मनोरुग्णास दिले अन्न- पाणी

parola janta karfew
parola janta karfew

पारोळा : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखणेसाठी जनता कर्फ्यु असल्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट आहे. हॉटेल्स, नास्त्याच्या गाड्या बंद असल्याने काहीही खाण्यास किंवा पिण्यास मिळत नाही. परिणामी शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांवर उपासमारीची वेळ आली असतांना पालिका कर्मचारी व डॉंक्‍टर यांनी माणुसकी जपत वृध्द महिलेस अन्न व पाणी देऊन तिची भुक भागविण्याचे काम केले. स्वार्थाने बरबटलेल्या जगात आज देखील माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन महसुल, पालिका व पोलिसांसह राजकिय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी करत असून नागरिकांना घरी बसा असे आवाहन करत आहेत. याच पाश्वभुमीवर पालिकेचे करोना नियंत्रण पथकाचे निरीक्षक सुभाष थोरात, उमंग लहान मुलांचे हॉस्पिटलचे डॉ. चेतन बडगुजर हे शहरात आवाहन करित असतांना महामार्गावरिल न्यायालयाच्या गेटसमोर वयस्कर मनोरुग्ण भुकेची आस लावुन बसल्याचे लक्षात आले. यानंतर श्री. थोरात व डॉ. बडगुजर यांनी माणुसकीपण दाखवत महिलेस अन्न व पाणी दिल्याने मनोरुग्णाचे मन गहीवरुन आले. ऐरवी शहरात मिळेल त्या ठिकाणी अन्न खाऊन वाटेल; त्या ठिकाणी गुजरान करणारी ती वृध्द महिला आज जनता कर्फ्युमुळे अन्नापासुन व्याकुळ झाली होती. परंतु देवरुपात आलेले थोरात व बडगुजर यामुळे तिची भुक भागल्याने आज देखील माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय समोर आला. अफव्याच्या भितीने महीलांचा हिरमोड कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणेसाठछी शासनाकडुन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. गर्दी व एकमेकांशी संपर्क कमी व्हावा यासाठी जनता कर्फ्युस तालुक्‍यासह शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत घरी राहणे पसंत केले. तर करोना विषाणु मारणेसाठी हवेत वायू सोडणार असल्याच्या अफवेच्या भितीने महिला वर्गानी कुरडई, पापड करणे नापसंत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com