esakal | मयत खाते धारकांना वारस लावुन कर्जमाफीचा लाभ 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer karjmafi

तालुक्यातील कर्जमाफीस पात्र शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम वेगाने सुरु अाहे.शेतकर्यांना सर्वेातोपरी सहकार्य करण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित आहे.
अनिल गवांदे -तहसिलदार

मयत खाते धारकांना वारस लावुन कर्जमाफीचा लाभ 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी  आधार प्रमाणिकरण अनिवार्य असुन तालुक्यात प्रमाणिकरण  जलद गतीने सुरु असुन आजवर 9 हजाराच्या वर शेतकर्यांचे प्रमाणिकरण झाल्याची माहीती तहसिलदार अनिल गवांदे यांनी  दिली आहे.
ज्या शेतकर्यांचे पीककर्ज दोन लाख रुपयापर्यतचे आहे.अश्या तालुक्यातील 14 हजार 376 शेतकर्याची यादी सहकार विभागाकडे प्राप्त झाली आहे.त्यात 12 हजार 608  शेतकर्यांच्या याद्या प्रत्येक विविध कार्यकारी सोसायटी व राष्ट्रीयकृत बँकेत लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी ता,6 रोजी दुपारी 2 वाजेपर्यत 9 हजार 698  शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असल्याची माहीती सुत्रांनी दिली.

मयत खातेधारकांच्या वारसास कर्जमाफीचा लाभ
कर्जमाफीनंतर जे शेतकरी मयत झाले किंवा त्यांचे नाव कर्जमाफीच्या याद्या प्रसिध्दीत आले.असे मयत शेतकर्यांचे नाव समाविष्ट झाले असेल तर अश्या शेतकर्यांनी ज्या संस्थेकडुन किंवा बँकेकडुन कर्ज घेतले असेल त्या ठिकाणी मयतास वारस लावुन वारसाच्या नावाने माहीती शासन पोर्टलवर अपलोड करुन वारस व्यक्तीने आधार प्रमाणिकरण करावे अशी माहीती सहकार विभागाकडुन प्राप्ती झाली असल्याने मयत खातेधारकाच्या वारसास कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

आधार प्रमाणिकरण होत नसलेल्या शेतकर्यांसाठी तक्रार समिती 
ज्या शेतकर्यांचे आधार प्रमाणित होत नाही अथवा कर्जरक्कम व इतर तपशील चुकीचा आलेला आहे.त्यांचेबाबतीत पोर्टलवर आँनलाईन तक्रार होवुन संबंधित तालुका तहसिल कार्यालय अथवा जिल्हास्तरिय समितीची नेमणुक करण्यात आली आहे.तालुक्यात 137  शेतकर्यांचे बोटांचे ठसे आले नाहीत.अश्या शेतकर्यांचे वरिष्ठांचे मार्गदर्शक सुचनेनुसार  तहसिलदार यांनी आवश्यक कागद पत्रांची पडताळणी करुन तक्रार निवारण करण्याचे काम हाती घेतले आहे.

ओटीपीनंबर देवुन आधार  प्रमाणिकरण 
ज्या शेतकर्यांचे बोटांचे ठसे म्हणजे ई के.वाय सी होत नाही अश्या शेतकर्यांनी आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर रिक्वेस्ट टाकुन ओटीपीच्या मदतीने प्रमाणिकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे असूनही ज्या शेतकऱ्यांच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 बाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक-3 पहिला मजला, आकाशवाणीजवळ, जळगाव या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा कार्यालयाच्या 0257-2239729 या दुरध्वनी क्रमांवर तसेच karjmukti.jalgaon@gmail.com या कार्यालयीन संकेत स्थळावर तक्रार करावी.असे सुत्राकडुन कळविण्यात आले आहे.कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्यांच्या याद्या वि.का.सोसायटी व राष्ट्रीय कृत बँकेत लावण्यात आल्या आहेत.शेतकर्यांनी सेतु सुविधा केंद्रात जावुन आधार प्रमाणित करावे.
जी.एच पाटील, सहाय्यक निबंधक सहकार विभाग,पारोळा 

आधार प्रमाणिकरणानंतर रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे.72 तासामध्ये संबंधित लाभार्थी शेतकर्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
सुभाष  पाटील, विभागीय  उप व्यवस्थापक जे.डी सी.सी.बँक,जळगांव 

loading image