ढोर बाजारात विक्रीसाठी आली आणि गायीने आश्चर्यकारक अशी लाखात एक घटना घडवली

भरत बागुल
Tuesday, 1 December 2020

आजपर्यंत गाईने दोन, तीन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चार वासरांना जन्म देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपळनेर : येथील सतीश आनंदा निकम या गायी म्हशीच्या व्यापाऱ्याच्या जर्सी गायीने चार वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही चारही वासरे धडधाकट आहेत. एकाच दिवशी वासरांना गायीने जन्म देणं ही लाखात एखादी घटना आहे. 

आवश्य वाचा- शिक्षक, मुख्याध्यापक कोरोनाच्या फेऱ्यात; शाळेबाबत प्रश्‍नचिन्हच 

पिंपळनेर येथील संजयनगर मधील रहिवासी सतीश आनंदा निकम (वय ४५) या गायी म्हशींच्या व्यापाऱ्याच्या जर्सी गाईने चार वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही चारही वासरे धडधाकट आहेत. एकाच दिवशी चार वासरांना गायीने जन्म देणं ही लाखात एखादी घटना असल्याचं जिल्ह्यात असल्याची चर्चा सुरू आहे.

गुजरात राज्यातील बलसाड येथील शेतकरी कडून ४३ हजार रुपये किमतीची गाय तीन दिवसापूर्वी विक्रीसाठी आणली होती. ती गाय बैल मार्केट कमिटीच्या आवारात विक्रीसाठी आणली असता. एक डिसेंबरला पहाटे एकटेच्या सुमारास दोन गोर्हे एक वासरीस जन्म दिला. यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टर असवार यांना बोलवण्यात आले होते. तर परत दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक गोऱ्यासाजन्म दिला. असे एकूण जर्सी जातीच्या गाईने चार वासरांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला.

आवर्जून वाचा-  कुटूंब अजूनही निशब्‍द..मित्रांच्‍या डोळ्यातील पाणी आटेना
 

आणि घटनेची जिल्ह्यात चर्चा 

आजपर्यंत गाईने दोन, तीन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चार वासरांना जन्म देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही गाय दोन्ही वेळेस एकूण पाच लीटर दूध देते. यामुळे जन्मलेल्या चारही वासरांना याचा फायदा होणार असल्याचे व्यापारी निकम यांनी सांगितले. या गायीला व वासरांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pimpalaner one cow gave birth to four calves