मुख्यमंञ्यांच्या शब्दामुळे डाँ राहुल आहेरांच्या रुपाने मंत्रिपद मिळण्याची संधी

live
live

खामखेडा-चांदवड -देवळा विधानसभा मतदार संघातून डॉ.राहुल आहेर यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तुम्ही आमदार द्या मी तुम्हांला मंत्री देतो या आवाहनामुळे डॉ राहुल आहेरांचे वडिल स्व डॉ डि एस आहेर यांच्या नंतर देवळ्याला डॉ राहुलआहेर यांच्या रूपाने मंत्रीपदाची लॉटरीच्या आश्वासनाने  आहेरांच्या दुसऱ्यांदा विजयाबरोबरच तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

           १९७२ ला देवळ्याचे जनुभाऊ आहेर यांच्यानंतर बेचाळीस वर्षांनंतर २०१४ मध्ये डॉ.राहुल आहेर यांच्या रूपाने देवळा तालुक्याला पहील्यांदा आमदारकी मिळाली व यंदाच्या विजयाने  पुन्हा  १९७२ व २०१४ ची पुनरावृत्ती झाली.डाॕ आहेर दुसऱ्यांना आमदार झालेत.जिल्ह्यातून भाजपाच्या इतर पाचही उमेदवारांपेक्षा स्व डॉ दौलतराव आहेर ह्यांचे पक्ष्यातील वलय डॉ राहुल आहेरांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक,अभ्यासु उच्यविद्याविभुषीत व्यक्तीमहत्व  म्हणुन मुख्यमंञ्यानी प्रचारसभेदरम्यान डॉ आहेराना दिलेल्या आश्वासनामुळे  मंत्रिपद  मिळण्याची हमखास संधी तालुकावासीय बाळगून आहेत.

     देवळा तालुक्यातील दोघांना तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याची  संधी मिळाली.स्व दौलतराव आहेर यांनी १९८५ मध्ये नाशिक शहरातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते.त्यांतर १९८९ मध्ये ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेत.हि कारकीर्द अल्पशी ठरली.त्यांतर १९९१ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आहेर पराभूत झालेत.१९९४ मध्ये तालुक्यातीलच शांताराम आहेर हे विधान परीषेदेवर गेलेत.१९९५ मध्ये डॉ दौलतराव आहेर पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय संपादित करत राज्याचे आरोग्यमंत्री झालेत.त्यानतर १९९९ मध्ये पुन्हा नाशिक मधून दौलतराव आहेर विधानसभेत गेलेत हि सर्व कारकीर्द त्यांनी नाशिकचे प्रतिनिधित्व करतांना केली.                      
    

स्व डॉ आहेरांनी देवळा तालुक्याची निर्मिती केली.सन २००४ च्या निवडणुकीत देवळा तालुक्याचा समावेश कळवण विधानसभा क्षेत्रातच होता. त्यांतर २००९ च्या निवडणुकीत देवळाचा समावेश चांदवड विधानसभा क्षेत्रात झाला.पहिल्या निवडणुकीत तालुक्यातील उमेदवाराला पराजयाचा सामना करावा लागला. 

२०१४ च्या  निवडणुकीत देवळा तालुक्यातून एकमेव उमेदवार असल्यामुळे डॉ राहुल आहेराना फायदा झाला.देवळा तालुक्यातुन ४४५४५ इतके मताधिक्य घेतले होते.या निवडणुकीत देवळा तालुक्यातून आहेरांना ५२७०६ मताधिक्य मिळाले.डॉ राहुल आहेर यांनी चांदवड तालुक्यातील जनतेसाठी  केलेल्या कामांची पावती  म्हणुन चांदवड तालुक्यातुन ४७८५४ मताधिक्य मिळाले.जेष्ठ बंधु केदा आहेर यांच्या कार्यकर्तुत्वाने तालुकावासियांनि आहेर यांच्यावर ५० हजारांपुढे विश्वास टाकला आहे.राज्यात पुन्हा भाजपसेनेचे सरकार स्थापन होण्याची स्थिती असुन डॉ आहेर यांना मुख्यमंञ्यांनी दिलेल्या शब्दामुळे तालुकावासीयांना मंत्रिपद व पालकमंत्रीपद मिळण्याची हमखास संधी तालुकावासीय बाळगून आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com