राज ठाकरेंची तोफ 26 ला नाशिकमध्ये धडाडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यभर गाजणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या मनसेला आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी जाहिर सभा घेतली जाणार आहे. येत्या 26 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर सभा होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी आज मनसेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. 

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिलला मतदान होत असल्याने शेवटच्या आठवड्यात सर्वचं पक्षांकडून सभा घेण्याचे नियोजन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 22 एप्रिला होणार असून त्यानंतर 24 किंवा 25 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी फौज नाशिक व दिंडोरीच्या मैदानात प्रचारासाठी उतरणार आहे. परंतू नाशिककरांना राज ठाकरे यांच्या सभेबद्दल उत्सुकता आहे

Web Title: marathi news raj thakre sabha