esakal | विविध क्षेत्रातील अनुभवाचा पक्ष मजबूतीसाठी उपयोग- प्रदेश सचिव राजेश पांडे
sakal

बोलून बातमी शोधा

live

विविध क्षेत्रातील अनुभवाचा पक्ष मजबूतीसाठी उपयोग- प्रदेश सचिव राजेश पांडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकः विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करण्यापासून अनेक विद्यापीठे,सार्वजनिक सांस्कृतिक संस्था आणि गेल्या बारा वर्षापासून ६०० जिल्ह्यापेक्षा जास्त ठिकाणी काम असलेल्या राष्ट्रीय युवा सहकारी संस्थेच्या युवा विद्यार्थी-क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात हजारो मित्रांच्या सहकार्याने काम करत आहे आणि करत राहिल,असे भाजपचे नवनियुक्त प्रदेश सचिव व  पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटक राजेश पांडे यांनी सांगितले. सर्वांच्या शुभेच्छा,सहकार्य मला राजकारण ,समाजकारण समजून घेण्यास प्रेरणा देईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज श्री.पांडे यांना  नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर  श्री.पांडे बोलत होते,ते म्हणाले,  आगामी काळातील पक्ष अधिक मजबूत करण्याबरोबरच  विधानसभा निवडणुकीसाठी परिश्रम घेणे, आणि पदवीधर मतदार नोंदणी अधिक जोमाने करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष. चंद्रकांत पाटील यांनी मला दिले आहे. गेल्या ३९ वर्षांच्या  सामाजिक- सार्वजनिक- शैक्षणिक जीवनातून खूप अनुभव घेतला. या काळात अगदी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील महाविद्यालय प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करण्यापासून विविध संस्था,सामाजिक संस्थांशी संपर्क आला, काम करण्याची संधी मिळाली त्याचा पक्षात काम करण्यासाठी निश्चितच मला उपयोग होईल. यापुढेही आपल्या शुभेच्छा, सहकार्य प्रेरणा देणाऱ्या ठरतील, यात शंकाच नाही.

पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना।
सब समाज को लिए साथ में, आगे है बढ़ते जाना।।
,....अर्थात निश्चित मी आपला खारीचा वाटा या कार्यातून उचलणार आहे. माझी ही निवड आणि मला संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझे ३९ वर्षातील सामाजिक जीवनातील मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील,  संघटन महामंत्री  विजयराव पुराणिक या सर्वांचा मी आभारी आहे.

नाशिकमध्ये फटाके फोडत,पेढे वाटत स्वागत

नाशिक परिसरात  राजेश पांडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्यावर फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. दृरदृष्टीकोन असलेल्या एका युवानेत्यांला यानिमित्ताने संधी मिळाली असून पक्ष मजबुतीसाठी निश्चीत खूप उपयोग होईल,अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीचे राज्य समन्वयक,भाजप पदाधिकारी  राजेश आढाव, सुनील बच्छाव, शरद कासार,विजय सोनवणे, राहुल वैघ,अशोक देशपांडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top