नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथे गतिरोधक बनवण्याचे काम सुरु

ज्ञानेश्वर गुळवे
शुक्रवार, 17 मे 2019

अस्वली स्टेशन: नाशिक-मुंबई महामार्ग बनलाय मृत्यचा सापळा अशा आशयाची बातमी सकाळमध्ये दोन दिवसांपुर्वी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर रस्ते प्राधिकरण महामंडळ प्रशासन खडबडून जागे झाले आणि गोंदे दुमाला फाट्यावर गतिरोधक बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. झेब्रा क्रॉसिंगवरही सिग्नल बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राजूर फाटा,पाडळी फाटा याठिकाणी ही गतिरोधक बनविण्यात येणार असून इतरही तांत्रिक बाबींचा वापर केला जाणार आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळणार असल्याची माहिती सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news road problem