esakal | तरूणांनी रस्त्यावर साबर तोडून आडवी करून गाव बंदी केली
sakal

बोलून बातमी शोधा

तरूणांनी रस्त्यावर साबर तोडून आडवी करून गाव बंदी केली

बंधारपाडा येथे येणाऱ्यांनी येवू नये रस्ता पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच डोंगरपाडा व ओझरपाडा ता.साक्री येथील नागरिकांनी देखील या गावातून जाता येणार नाही तरि त्यांनी ही आपल्या गावात व घरातच लाँक आँन करून घरातच रहावे. 

तरूणांनी रस्त्यावर साबर तोडून आडवी करून गाव बंदी केली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंधारपाडा : बंधारपाडा (ता.साक्री) गावातून डोंगरपाडा,ओझरपाडा कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये व बाहेरील नागरीकांना गावात प्रवेशबंदी केली असून गावातील बाहेर गावी गेलेल्या नागरिकांनी देखील दवाखान्यात जाऊन तपासणी  करूनच गावात यायचे आहे.

पिंपळनेरच्या पश्र्चिमपट्टयातील जागृत ग्रामस्थ व नागरिकांनी कोरोणा पासून सुरक्षिततेसाठी व शासनाच्या नियमानुसार 14 एप्रिल पर्यंत गावात कुणाला प्रवेश नाही व गावातील कुणालाही बाहेर जाता येणार नाही म्हणून गावातील रस्ता पुर्ण पणे बंद करण्यात आला. गावातील बाहेरगावी रहाणारे नागरिक देखील दवाखान्यात जाऊन तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश देण्यात येईल त्यामुळे गावातील नागरिकांनी व बंधारपाडा येथे येणाऱ्यांनी येवू नये रस्ता पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच डोंगरपाडा व ओझरपाडा ता.साक्री येथील नागरिकांनी देखील या गावातून जाता येणार नाही तरि त्यांनी ही आपल्या गावात व घरातच लाँक आँन करून घरातच रहावे. 


गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हि उपाय योजना करण्यात आली असून बाहेरच्या लोकांन करावी कुठल्याही प्रकारची लागण होऊ नये यासाठी गावात चोरून,लपवुन कुणी आल्यास त्याला तात्काळ दवाखान्यात तपासणी साठी पाठवा. व एकमेकांशी संवाद साधतांना काळजी घ्या शक्यतोर लांबून बोला तोंडावर रूमाल किंवा मास्क लावा. त्यामुळेच बंधारपाडा येथील तरूणांनी रस्त्यावर साबर तोडून आडवी करून गाव बंदी केली आहे, तसेच नवापाडा ता.साक्री  येथील ग्रामस्थांनी सर्वानूमते असं ठरविले की गावातून कुणीही बाहेर जायला नको व गावात बाहेर गावाहून कुणीही गावात यायला नको म्हणून रत्यावर टँक्टर ची ट्राँली आडवी लावुन दिली. व त्यावर लिहून दिलं की संचारबंदी असल्याने गावात प्रवेश नाही

loading image