esakal | हा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

sarangkheda mobile range

सातपुड्याच्या डोंगराळ भागांमध्ये रेंज मिळत असेल ही कल्पनाच न केलेली बरी. रेंजच्या भावी केवळ संपर्कच नाही; तर अलीकडच्या काळात सुरु झालेल्या ऑनलाईन अभ्यासापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचे चित्र आहे.

हा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील ग्रामस्थांना गावात मोबाईल रेंज मिळत नसल्याने पाण्याचा टाकीवर चढून फोनवर संवाद साधावा लागतो.
केंद्र सरकार डिजिटल यंत्रणेवर भर देत आहे. त्याचा गवगवा मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्यक्षात सातुर्खे गावात अद्यापही मोबाईलची रेंज मिळत नाही. त्यामुळे उंच ठिकाण, शेत, झाडावर किंवा गावातील पाण्याचा टाकीवर चढून नेटवर्क शोधावा लागतो. अशा स्थितीत डिजिटल इंडियाचा गाजावाजा करताना लहान गावांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जिल्हा मुख्यालयापासून काही किलो मिटर अंतरावर ही स्थिती असेल तर सातपुड्याच्या डोंगराळ भागांमध्ये रेंज मिळत असेल ही कल्पनाच न केलेली बरी. रेंजच्या भावी केवळ संपर्कच नाही; तर अलीकडच्या काळात सुरु झालेल्या ऑनलाईन अभ्यासापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचे चित्र आहे.

अॅड्राइड फोन नावालाच
या गावापासून तीन किलोमिटर अंतरावर निमगुळ (ता. शिंदखेडा) येथील टॉवरच्या नेतवर्कवर मोबाईल चालतात. मात्र गेल्या वर्षभरापासून त्या गावातून मिळणारी रेंज ही आता घरात येत नाही. सुशिक्षित व तरुणांकडे अॅड्रॉईड मोबाईल आहेत. महिलांना बाहेर पडता येत नाही, म्हणून व्हिडीओ कॉल नेटवर्क, ऑनलाईन शिक्षण, फेसबूक, व्हॉटस्अॅपपासून दुरापास्तच आहे.

मोबाईल कंपन्या घेईनात दखल
मागील अनेक महिन्यापासून गावात मोबाईल टॉवर उभारून ग्राहकांची गैरसोय टाळावी. ही मागणी पुढे येते. मात्र त्याची दखल कंपन्यांकडून घेण्यात आली नाही. याबाबत खासदार हिना गावीत यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. दरमहिन्याला प्रत्येक मोबाईल धारकाला सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज चा खर्च करावा लागतो. 


आमच्या गावात मोबाईल हातातला खेळणे म्हणून राहीले आहे . गावापासून लांब , शेतात , उंच ठिकाणावर जाऊन रेज शोधावी लागते . त्यामुळे डिजिटल योजनेचा बोजवारा उडाला आहे .विविध कंपनी मालकांचे पुतळयाचे दहन करुन संताप व्यक्त केला जाणार आहे .
- हिरालाल पाटील, ग्रामस्थ

संपादन ः राजेश सोनवणे