esakal | दगड, माती, मुरमासाठी शहादा तालुक्यातील विनापरवाना डोंगर पोखरले जाताय !
sakal

बोलून बातमी शोधा

दगड, माती, मुरमासाठी शहादा तालुक्यातील विनापरवाना डोंगर पोखरले जाताय !

अवैध उत्खननावर कारवाया होत असल्या तरी त्या मर्यादितच आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायातून महसूल विभागाचेही मोठे नुकसान होते आहे. 

दगड, माती, मुरमासाठी शहादा तालुक्यातील विनापरवाना डोंगर पोखरले जाताय !

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा : मोठे प्रयत्न करूनही अल्पशा यश मिळाले तर ' डोंगर पोखरून उंदीर काढणे ' अशी म्हण वापरी जाते. प्रत्यक्षात स्टोन क्रशरवाले अवैधरीत्या डोंगर पोखरत आहे. त्यामुळे विनापरवाना स्टोन क्रशरवाले शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल ही बुडताेय  तसेच खाणकामासाठी स्फोटके वापरत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. 

शहादा तालुक्यात वाळू माफियांनंतर आता दगड खाण माफीयांनी डोके वर काढले आहे .डोंगर दिसला की, तो पोखरून माती, मुरुम, दगड हे गौण खनिज काढण्याचा सपाटा सुरुच केला आहे . त्यामुळे डोंगरांना खाणींचा विळखा आहे. वाढते बांधकाम, रस्ते आदीसाठी मुरुम, दगड, खडीच्या वाढत्या आवश्यकतेमुळे डोंगर फोडून दिवस-रात्र क्रशर चालविले जात आहे.

महसुल विभागाचे मोठे नुकसान

अत्पवधीत बक्कळ पैसा देणाऱ्या स्टोन क्रेशर व्यवसायाची सद्या चलती आहे. दगडखाणी, मुरुम व वाळू लिलावातून सरकारला सर्वार्धिक उत्यन्न मिळते आहे. या लिलावातुन कोटयावधीचे उद्दिष्ट पूर्ण होतो. अवैध उत्खननावर कारवाया होत असल्या तरी त्या मर्यादितच आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायातून महसूल विभागाचेही मोठे नुकसान होते आहे. 

अशी दिली जाते परवानगी

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियमानुसार मंजूरी करण्यात येतात . गौण खनिजाच्या उत्खनन करिता दिर्घ मुदतीचे खणिपट्टे , तात्पुरते परवाने व लिलावाद्वारे गौण खनिजाची निर्गती अशा स्वरूपात परवानगी देण्यात येते . गौण खनिजा करिता जिल्हाधिकारी हे सक्षम अधिकारी आहेत .

पर्यावरणाला बनतोय धोका
जंगल संपत्तीने समृद्ध असलेल्या बहुतांश गावांमध्ये माफियांकडून दगड खाणीचा व्यवसाय सुरू केला आहे . पाच, सात वर्षापासून डोंगर फोडलेले दिसतात .जेथे दगड संपले अशा ठिकाणी डोंगराळ भागात सर्वत्र भले मोठे खड्डेच खड्डे आहेत. तसेच. खाणकामासाठी स्फोटके वापरली जात असल्याने तेथील वन्यजीव व पर्यावरणाला याचा धोका निर्णाण झाले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे