विदर्भात जोरदार पाऊस आणि गुजरात राज्यातील मासे खानदेशात

तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने हतनुर धरणाचे पाणी सोडल्याने तापी नदीला पूर आला आहे.
fish
fish

सारंगखेडा : 'चवीला खाणार त्याला ताज़े मासे मिळणार' तापी नदीतील गोड्या पाण्यातील ताजे मासे (fish) जागेवरच मिळत असल्याने खवय्यांनाही मोठी पर्वणी ठरत आहे. विदर्भात (Vidharb) जोरदार पावसामुळे हतनुर धरणातील (Hatnur dam) पाणी साठा वाढल्याने तापी नदीचे पात्र तुडुंब भरलेली आहे. या पूरामुळे उकई ( गुजरात ) (Gujarat) धरणात (Ukai Dam) पालन पोषण झालं तरी खानदेशातील लोकांना गुजरात च्या माशांची चव घेता येत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. बांगडा व इतर गावठी मासे पकडून रोजगार मिळाला आहे.

(flooding of tapi river boosts fishing business in nandurbar district)

fish
बंधाऱ्यावरील फळ्या न काढल्याने नवापुरातील काही गावांना धोका


तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने हतनुर धरणाचे पाणी सोडल्याने तापी नदीला पूर आला आहे. तापी नदीला पूर आल्यामुळे तापी पात्रातील पाणी उकई ( गुजरात ) धरणात पोहचल्याने उकई धरणातील मासे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहोतात . त्यामुळे प्रकाशा , सारंगखेडा प्रकल्पातील पाणी साठयात मोठया प्रमाणात आल्याने . त्यातून सारंगखेडा तापी पात्रात मासेमारीला सध्या सुगीचे दिवस आहेत . सोबतच खवय्यांचीही चगळ आहे.

fish
नंदुरबार जिल्ह्यात पीककर्जाचे केवळ ३८ टक्केच वाटप
fish
fish


मासे खवय्यांचे सुगीचे दिवस
तापी नदीला ( ता. १३ ) जुलै ला पूर आल्याने सारंगखेडा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते . दहा दिवसानंतर दुसऱ्यांदा पुन्हा तापी नदीला पूर आला आहे . तापी नदी दुथडी भरून वाहत आहे . तापीला पूर आल्याने मासे खवयांना सुगीचे दिवस आले आहेत . तापी नदीचा पुला च्या दोघी टोकाला सारंगखेडा , टाकरखेडा ( ता. शिंदखेडा ) या ठिकाणी रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर मासे विक्री होते . शहादा , दोंडाईचा रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते . या ठिकाणावरुन मासे खवय्यांची मासे खरेदी साठी गर्दी असते . सध्या कायवा , लालपरी , कटले , आर्ली , डोखीन , वाम , एककाटी आदी प्रकारचे मासे या भागात मिळून येतात. प्रति किलो दोन शे ते अडीचशे रुपये दराने विक्री होते .पाणी साठया मुळे स्थानिक मच्छीमारांना दिलासा मिळाला असून तर खवय्यांनाही मोठी पर्वणी ठरत आहे.

fish
खानदेशात कानूमातेच्या स्वागताची जय्यद तयारी; बाजारपेठ उजळली


जिल्हयात समाधानकारक पाऊस.
जिल्हयात दिडमहीन्यापासून समाधानकारक पाऊस न होता त्यामुळे. पेरण्या रखडल्या होत्या. आता कापुस, मुग, ज्वारी, सोयाबीन आदी पीक पेरण्यांची मुदत संपली आहे. पेरणी झालेल्या पिकांना पाऊसाची गरज होती. ( ता. २४ ) रात्री पाऊसाची सततदार सुरु आहे. त्यामुळे पिकांना जिवदान मिळाले आहे. राज्यात पावसाने कहर केल्याने तापीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. जीवनवाहिनी असलेली तापी दुथडी वाहत आहे साठवलेले पाणी डोळयादेखत दुसऱ्या राज्यात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र मासेमारी करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com