esakal | खबरदार, कोणी तापी नदीवर गेले तर !
sakal

बोलून बातमी शोधा

खबरदार, कोणी तापी नदीवर गेले तर !
ग्रामपंचायत मार्फत गावात प्रत्येकाचा दारात कर्मचारी येतील त्यांचा कडे मूर्ती द्यावी. सोबत ट्रक्टर असेल त्यांवर मूर्ती संकलन करून ठेवावी.

खबरदार, कोणी तापी नदीवर गेले तर !

sakal_logo
By
रमेश पाटील

  
सारंगखेडा : खबरदार .. कोणी तापी नदीवर गेले तर .. आम्ही प्रत्येकांचा घरा जवळ ट्रक्टर घेऊन येऊ . त्यात गणेशाची मूर्ति ठेवावी . अशी सूचना सारंगखेडा येथे उद्या .( ता. 26 ) गणेश विसर्जना निमित्त देण्यात आली असून , गावात घरगुती गणेश प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेश भक्ताच्या घरी जाऊन ग्रामपंचायत कर्मचारी गणेशाची मूर्ती संकलन करणार आहेत.

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी तसेच तापी नदीपात्रात बॅरेजच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्यात वाढ होऊन तापी नदी दूथडी भरून वाहत असल्याने उद्या .ता. 26 रोजी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जन करण्यात येणार आहे . गावातील घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशभक्तांनी तापी नदी पात्रात विसर्जनासाठी जाऊ नये , ग्रामपंचायत मार्फत गावात प्रत्येकाचा दारात कर्मचारी येतील त्यांचा कडे मूर्ती द्यावी . सोबत ट्रक्टर असेल त्यांवर मूर्ती संकलन करून ठेवावी व सामूहिक विसर्जन ग्रामपंचायत , पोलीस प्रशासन करतील अशी सूचना देण्यात आली आहे .

कृत्रीम तलावात ही करता येईल विसर्जन

गणेश विसर्जनासाठी तापी नदीत जाऊ नये कोणाला स्वतः गणेश विसर्जन करायची असेल तर पोलीस ठाण्या समोर कृत्रीम पाण्याचा तलाव तयार केला असून त्या ठिकाणी शांततेत येऊन . कोणत्याही प्रकारचे वाद्य न वाजवता विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे . तापी नदी पात्रात अथवा तापी नदीच्या पुलावरून गणेश विसर्जन करता आढळले तर कायदेशिर कार्यवाही करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे .

गावात एकही सार्वजनिक मंडळ नाही .

गावात दरवर्षी पंधरा पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळ गणेश प्रतिष्ठापना करतात . व पाचव्या दिवशी विसर्जन करतात . मात्र , यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून एक ही सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश प्रतिष्ठापना केली नाही . सारंगखेडा पोलिस ठाण्यातंर्गत 41 गावात एकही सार्वजनिक गणेश मंडळ नसल्याचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.

संपादन- भूषण श्रीखंडे


 

loading image
go to top