आठ वर्षापासून बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात "कोरोना'... तरी नवीन कसा !

आठ वर्षापासून बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात "कोरोना'... तरी नवीन कसा !

शहादा : एकीकडे संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो नवखा असल्याने त्यावर अपेक्षित लस व औषधी शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस रात्र करीत आहेत. मात्र या कोरोना व्हायरस संदर्भाची माहिती राज्यातील बारावीच्या जीवशास्त्राच्या क्रमिक पुस्तकात असून गत आठ वर्षांपासून शिक्षक या विषाणूची माहिती विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. हा व्हायरस नवखा नाही, पण यावरील संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची झळ सध्या संपूर्ण जगाला बसत आहे. 

कोरोना व्हायरसने आपल्या देशात शिरकाव केल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाय योजनांसह शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. यासोबातच गर्दी होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेतली जात आहे. एकीकडे कोरोना बाधीत रूग्णावर उपचाराची व्यवस्था करतानाच कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस आणि औषधी शोधण्यासाठी देशातील शास्त्रज्ञही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तरी रूग्णांची संख्या वाढत असल्याने शासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

हा व्हायरस पहिल्यांदा आढळून आल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी जीवशास्त्र विषयाच्या क्रमिक पुस्तकात या व्हायरसचा व त्याला प्रतिबंध करण्यासाठी अपेक्षित औषध नाही. तसेच हॅण्ड सॉनिटायझर याला आपल्याला कमी संरक्षण प्रदान करत असल्याचा उल्लेख आहे. 

राज्य मंडळाने शैक्षणिक जून २०१२ पासून बारावी विज्ञानाच्या चारही विषयाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केला होता. त्यात जीवशास्त्र विषय शिकविताना विद्यार्थ्यांना सर्वसाधारण दहा आजारांची माहिती होण्यासह ते कोणामुळे, कोणा मार्फत संक्रमित होतो, आजार कसा ओळखतात (लक्षणे) (symptoms), झाला तर कोणती काळजी घ्यावी, अपेक्षित औषधी यावर थोडक्यात माहिती दिली आहे. सदरच्या तेरा क्रमांकाचे प्रकरण ह्युमन हेल्थ ऍण्ड  डिसिसेस या प्रकरणात पुस्तकातील पान क्र. १६६ वर सातव्या क्रमांकावर 'कॉमन कोल्ड' या आजाराची माहिती दिली आहे. हीच किंवा त्यापेक्षा जास्तची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देत असतात. 

पुस्तकातील अनुवादीत केलेली माहिती अशी, सामान्य सर्दीला (Common Cold) नॕसोफॅरिन्जायटीस, तीव्र विषाणूजन्य दाह, तीव्र कोरीझा किंवा सर्दी आदी नावाने ओळखले जाते. हा श्वसन प्रणालीचा एक विषाणूजन्य रोग आहे जो प्रामुख्याने 'राइनोव्हायरस' आणि 'कोरोनाव्हायरस'मुळे होतो. सामान्य लक्षणांमधे खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे आणि ताप येणे समाविष्ट आहे. कालावधी कमी करणारे कोणतेही ज्ञात उपचार सध्या नाही. तथापि, 
लक्षणे सहसा ७ ते १० दिवसांत उत्स्फूर्तपणे सुटतात आणि काही लक्षणे शक्यतो तीन आठवड्यांपर्यंत असतात. सामान्य सर्दी हा मानवांमध्ये सर्वात जास्त वारंवार होणारा संसर्गजन्य आजार आहे. ज्यात सरासरी प्रौढ व्यक्ती दोन ते चार संक्रमणास कारणीभूत असते आणि एका वर्षात साधारणतः ६ ते १२ वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग होतो. एकत्रितपणे, सर्दी, इन्फ्लूएन्झा आणि तत्सम लक्षणांसह इतर अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूआरटीआय) इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराच्या निदानामध्ये समाविष्ट आहेत. खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि नाक बंद होणे ही लक्षणे आहेत; कधीकधी यासह डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (गुलाबी डोळा), स्नायू दुखणे, थकवा, डोकेदुखी, थरथरणे आणि भूक न लागणे देखील असू शकते. 

सामान्य सर्दीचा उत्तम प्रतिबंध म्हणजे संक्रमित लोकांपासून दूर राहणे आणि संक्रमित व्यक्ती ज्या ठिकाणी रहातात, अशा ठिकाणांपासून दूर रहाणे आवश्यक आहे. साध्या साबणाने आणि पाण्याने हात धुण्याची शिफारस केली जाते. साध्या साबणाने हात चोळण्यासह स्वच्छ धुऊन कोरडे करण्याची यांत्रिक कृती केल्याने विषाणूचे कण हातावरून नष्ट होतात. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्स अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शनपासून कमी संरक्षण प्रदान करतात. 
याचाच परामर्श असा की, आजार माहीत होता पण त्याची तीव्रता दिसत नसल्याने त्यावरील औषधासाठीच्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले गेले. 
 

 ः एकीकडे संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो नवखा असल्याने त्यावर अपेक्षित लस व औषधी शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस रात्र करीत आहेत. मात्र या कोरोना व्हायरस संदर्भाची माहिती राज्यातील बारावीच्या जीवशास्त्राच्या क्रमिक पुस्तकात असून गत आठ वर्षांपासून शिक्षक या विषाणूची माहिती विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. हा व्हायरस नवखा नाही, पण यावरील संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची झळ सध्या संपूर्ण जगाला बसत आहे. 

कोरोना व्हायरसने आपल्या देशात शिरकाव केल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाय योजनांसह शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. यासोबातच गर्दी होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेतली जात आहे. एकीकडे कोरोना बाधीत रूग्णावर उपचाराची व्यवस्था करतानाच कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस आणि औषधी शोधण्यासाठी देशातील शास्त्रज्ञही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तरी रूग्णांची संख्या वाढत असल्याने शासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

हा व्हायरस पहिल्यांदा आढळून आल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी जीवशास्त्र विषयाच्या क्रमिक पुस्तकात या व्हायरसचा व त्याला प्रतिबंध करण्यासाठी अपेक्षित औषध नाही. तसेच हॕण्ड सॕनिटायझर्टस याला आपल्याला कमी संरक्षण प्रदान करत असल्याचा उल्लेख आहे. 

राज्य मंडळाने शैक्षणिक जून २०१२ पासून बारावी विज्ञानाच्या चारही विषयाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केला होता. त्यात जीवशास्त्र विषय शिकविताना विद्यार्थ्यांना सर्वसाधारण दहा आजारांची माहिती होण्यासह ते कोणामुळे, कोणा मार्फत संक्रमित होतो, आजार कसा ओळखतात (लक्षणे) (symptoms), झाला तर कोणती काळजी घ्यावी, अपेक्षित औषधी यावर थोडक्यात माहिती दिली आहे. सदरच्या तेरा क्रमांकाचे प्रकरण ह्युमन हेल्थ ॲण्ड डिसिसेस या प्रकरणात पुस्तकातील पान क्र. १६६ वर सातव्या क्रमांकावर 'कॉमन कोल्ड' या आजाराची माहिती दिली आहे. हीच किंवा त्यापेक्षा जास्तची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देत असतात. 

पुस्तकातील अनुवादीत केलेली माहिती अशी, सामान्य सर्दीला (Common Cold) नॕसोफॅरिन्जायटीस, तीव्र विषाणूजन्य दाह, तीव्र कोरीझा किंवा सर्दी आदी नावाने ओळखले जाते. हा श्वसन प्रणालीचा एक विषाणूजन्य रोग आहे जो प्रामुख्याने 'राइनोव्हायरस' आणि 'कोरोनाव्हायरस'मुळे होतो. सामान्य लक्षणांमधे खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे आणि ताप येणे समाविष्ट आहे. कालावधी कमी करणारे कोणतेही ज्ञात उपचार सध्या नाही. तथापि, लक्षणे सहसा ७ ते १० दिवसांत उत्स्फूर्तपणे सुटतात आणि काही लक्षणे शक्यतो तीन आठवड्यांपर्यंत असतात. सामान्य सर्दी हा मानवांमध्ये सर्वात जास्त वारंवार होणारा संसर्गजन्य आजार आहे. ज्यात सरासरी प्रौढ व्यक्ती दोन ते चार संक्रमणास कारणीभूत असते आणि एका वर्षात साधारणतः ६ ते १२ वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग होतो. एकत्रितपणे, सर्दी, इन्फ्लूएन्झा आणि तत्सम लक्षणांसह इतर अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूआरटीआय) इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराच्या निदानामध्ये समाविष्ट आहेत. खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि नाक बंद होणे ही लक्षणे आहेत; कधीकधी यासह डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (गुलाबी डोळा), स्नायू दुखणे, थकवा, डोकेदुखी, थरथरणे आणि भूक न लागणे देखील असू शकते. 

सामान्य सर्दीचा उत्तम प्रतिबंध म्हणजे संक्रमित लोकांपासून दूर राहणे आणि संक्रमित व्यक्ती ज्या ठिकाणी रहातात, अशा ठिकाणांपासून दूर रहाणे आवश्यक आहे. साध्या साबणाने आणि पाण्याने हात धुण्याची शिफारस केली जाते. साध्या साबणाने हात चोळण्यासह स्वच्छ धुऊन कोरडे करण्याची यांत्रिक कृती केल्याने विषाणूचे कण हातावरून नष्ट होतात. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्स अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शनपासून कमी संरक्षण प्रदान करतात. 
याचाच परामर्श असा की, आजार माहीत होता पण त्याची तीव्रता दिसत नसल्याने त्यावरील औषधासाठीच्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले गेले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com