esakal | अखेर प्रदीर्घ चर्चेअंती पपई दराचा तिढा सुटला !
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर प्रदीर्घ चर्चेअंती पपई दराचा तिढा सुटला !

लॉकडाऊन होण्याची झाल्यास शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे ही नुकसान होईल या हेतूने तातडीने बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

अखेर प्रदीर्घ चर्चेअंती पपई दराचा तिढा सुटला !

sakal_logo
By
धनराज माळी


शहादा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांचा सूचनेनुसार पपई दाराच्या तिढा सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ,व्यापारी, पपई उत्पादक शेतकरी समन्वय समिती व शेतकरी यांच्यात तब्बल चार तास प्रदीर्घ चर्चा होऊन अखेर सात रुपये अकरा पैसे पपईचा दर ठरविण्यात आला.

वाचा- बँड व्यावसायिकांनी खासदार डॉ. भामरेंना घातले साकडे -

उत्तर भारतात पपईचे दर चांगले असूनही येथील पपई खरेदीदार व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांकडून पपई खरेदी करत होते यासाठी पपई उत्पादक संघर्ष समिती प्रशासनात मध्यस्थी आवाहन केले होते त्यानुसार (ता.२०) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी ,कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय चौधरी आणि पपई उत्पादक समन्वय समिती,व्यापारी, शेतकरी यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी समन्वयाने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार व्यापारी शेतकऱ्यांमध्ये आज चर्चा झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक

त्यात तीन दिवसात उत्तर भारतातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन होण्याची झाल्यास शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे ही नुकसान होईल या हेतूने तातडीने बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. सुमारे चार तास दरा संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी समनव्यातुन सात रुपये अकरा पैसे दर निश्चित केला. पुढील बैठक होईपर्यंत या दराने पपईची तोडणी करावी असे आवाहन करण्यात आले.

यावेळी बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, दीपक पाटील, डॉ. उमेश पाटील, प्रफुल पाटील, राकेश गिरासे, दिनेश पाटील, संदीप माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते.तर व्यापारी प्रतिनिधी म्हणून नाजिम बागवान, फारुक बागवान, हाशिमभाई मुल्लाजी, इक्बाल बागवान ,शहबाज पठाण ,प्रकाश भाई राजस्थानी, जोगाराम भाई राजस्थानी, छोटेराम राजस्थानी आदींसह व्यापारीही उपस्थित होते.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे