अरेच्चा..."कोरोना' ला घाबरून घोड्याने देखील लावले मास्क !

लोटन धोबी 
Tuesday, 9 June 2020

मोजक्‍याच पाहुण्यांच्या साक्षीने आदर्श विवाहाची रेशिम गाठ बांधली. विशेष म्हणजे या वरातीतील घोड्यालाही मास्क बांधत कोरोनाला दूर ठेवण्यात आला

शहादा ः "कोरोना' विषाणुंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये "कोरोना' आजाराला नागरिक चांगलेच आता घाबरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षीत उपायोजना करण्याची जागृती वाढली आहेच. प्राण्यांना देखील कोरोनाची लागण होत असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नागरिक आता जागृत झाले आहे. ही गोष्ट आजा शहादा येथील एका धोबी समाजाच्या लग्नसंभारत नवरदेवासोबत घोड्याने देखील मास्क लावून "कोरोना'ला दूर ठेवण्याचा संदेश दिला आहे. 

शहादा येथील भिक्कन सोनू काकुळदे यांचे सुपुत्र मयंक व सवाई मुकटी ता.शिंदखेडा येथील संजय भाईदास सोनवणे यांची सुकन्या प्रतिक्षा यांचा विवाह आज जून रोजी सकाळी . वाजतां साध्या पध्दतीने उत्साहात झाला. धोबी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष लोटन धोबी ,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी,नारायण बच्छाव प्रकाश चव्हाण , विभागीय युवा अध्यक्ष संतोष वाल्हे,समाजाचे अध्यक्ष विठ्ठल बच्छाव, युवा अध्यक्ष धनंजय बच्छाव, मोहन बच्छाव, आनंदा सूर्यवंशी, कृष्णा मोरे,विकास राव गणेशआप्पा बच्छाव,आदी उपस्थित होते.. 

आदर्श विवाहाची रेशीम गाठी 
कोरोना वाढू नये म्हणून काकुळदे, सोनवणे परिवाराने नियमांचे पूर्णपणे पालन करीत मोजक्‍याच पाहुण्यांच्या साक्षीने आदर्श विवाहाची रेशिम गाठ बांधली. विशेष म्हणजे या वरातीतील घोड्यालाही मास्क बांधत कोरोनाला दूर ठेवण्यात आला. कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी वधु..वर पक्षाने योग्य तो निर्णय घेतला. 

मोजकेच लोक, शिस्तीचे पालन 
मंडपाच्या प्रवेशदारातच सॅंनिटायझर फवारणीचा तंबू लावण्यात आला होता शिवाय प्रत्येकाला मास्क देण्यात आला .अत्यंत शिस्तीने उपस्थितांनी फिजिकल डिस्टींगचे तंतोतंत पालन केले. विशेष म्हणजे वरातीतील घोड्यालाही मास्क बांधण्यात आले होते. ते अतिशय लक्षवेधी ठरले होते, घोड्यालाही किंवा त्यापासूनही कोरोना फैलावू नये म्हणू न केलेल्या या उपायपयौजनेची शहरात खूप चर्चा होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada The horse also masks with the bride at the wedding