Video : धरणाच्या दुरुस्तीच्या नावाने लावला चुन्याचा गिलावा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी यांनी या प्रकरणाची दखल घेत पाठबंधारे विभाग तसेच जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री यांच्याशी सतत पाठपुरावा सुरू ठेवला व अशा परिस्थितीत यावर्षी धरणाचे काम सुरू झाले, परंतु काम सुरू केले हे पाटबंधारे विभागाने किंवा कॉन्ट्रॅक्टरने स्थानिक शेतकरी, सरपंच, युवा मंचचे अध्यक्ष यांना कोणालाही न सांगता कामाला परस्पर सुरुवात केली.

कहाटूल (ता.शहादा) : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लोंढरे धरणाच्या सांडवा पूर्णपणे नादुरुस्त आहे. अशा परिस्थितीत धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण फुटल्यानंतर सात ते आठ गावांना या पाण्याचा फटका बसू शकतो. असे असताना पाटबंधारे विभागाने थातुरमातूर डागडुजी करीत दिशाभुल केली आहे.

 

महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी यांनी या प्रकरणाची दखल घेत पाठबंधारे विभाग तसेच जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री यांच्याशी सतत पाठपुरावा सुरू ठेवला व अशा परिस्थितीत यावर्षी धरणाचे काम सुरू झाले, परंतु काम सुरू केले हे पाटबंधारे विभागाने किंवा कॉन्ट्रॅक्टरने स्थानिक शेतकरी, सरपंच, युवा मंचचे अध्यक्ष यांना कोणालाही न सांगता कामाला परस्पर सुरुवात केली. काम सुरू असताना ईश्वर माळी यांनी पाटबंधारे विभागाकडे ध्वनीभ्रमणद्वारे संपर्क केला असता या विभागाने काम सुरू झाले नसल्याची माहिती शाखा अभियंता एम. बी. पाटील यांनी दिली. परंतु प्रत्यक्षात सहा दिवसांपासून कामाला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळी तसेच लोंढेरे सरपंच दिनेश  चंद्रसिग मालचे, उपसरपंच हिम्मत रोकडे परिसरातील शेतकरी यांनी पाहणी केली असता अतिशय निकृष्ट असे काम केले जात होते. तेथील जुनाट दगड वापरला जात होता. माती मिश्रित रीतीच्या वापर केला जात होता व खड्डे हे भरले जात होते. विचारणा केली असता एम. बी. पाटील शाखा अभियंता यांनी सांगितले, की काम मंजूर होत नव्हतं अजून मंजूरही झाले नाही. मी माझ्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे.
त्या क्षणी लोंढेरे धरणावरून कार्यकारी अभियंता विश्वास दराडे यांना कॉल केला असता त्यांनी सुट्टी घेतल्याचे सांगितले. बेहरे साहेबांकडे चार्ज असल्याचे सांगितले बे हरे साहेबांशी संपर्क साधला असता त्यांना सविस्तर कामाची माहिती कळवली असता त्यांनी सहाय्यक अभियंता सचिन शिंदे यांना पाहणीसाठी पाठवले. पाहणी झाल्यानंतर अध्यापही कामाला सुरुवात झाली नाही.
परंतु, अशा या निकृष्ट व डागडुगी केलेल्या कामाच्या कोणताही फायदा होणार नाही, सांडव्याची गळती बंद होणार नाही व भविष्यात तोच त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. महात्मा फुले युवा मंच व शेतकर्‍यांच्यावतीने वारंवार सांडवा पूर्णपणे दुरुस्ती व्हावा; अशी मागणी केली जात होती. तरीही पाटबंधारे विभाग तात्पुरती दागदुगी करून आपला मार्ग मोकळा करून शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहे.
गेल्या पावसाळ्यात महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच यांच्यावतीने लोंढेरे धरणावरती जलपूजन केले असता आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पाहणी करून पाटबंधारे विभागाला तात्काळ दुरुस्ती व्हावी असे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणीही होत होती. 55 लाखाची इस्टिमेट ही तयार करण्यात आले होते. परंतु आता फक्त दगदुगीच का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. लोंढेरे धरणाच्या कामाची पाटबंधारे विभागाने खेळखंडोबा लावला आहे, शेतकऱ्यांची कुठली च चिंता शासनाला नाही असे स्पष्ट दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada londhare dam repairing and patbandhare department Misleading