शहादा बाजार समितीचा विक्रम : इतका कापूस खरेदी अन्‌ इतके पेमेंट अदा करत राज्यात ठरले प्रथम 

cotton kharedi
cotton kharedi
Updated on

शहादा : येथील बाजार समितीने तालुका पातळीवर कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हंगामात बाजार समितीने सीसीआयच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख तीस हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असून त्यापोटी १२४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्सिंग पालन करीत समितीने सुमारे ५२ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असल्याची माहिती सभापती सुनील पाटील यांनी दिली. 

केंद्राने चालू हंगामात कापसाचे दर पाच हजार ४५० रूपये प्रति क्विंटल जाहीर केले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारात कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी होते. त्यामुळे सीसीआयच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येथील बाजार समितीने १५ नोव्हेंबरपासून तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला योग्य किंमत प्राप्त होणार होती. १५ नोव्हेंबर ते कोरोनामुळे जाहीर झालेला जनता कर्फ्यु अर्थात २२ मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत कापसाची खरेदी नियमित सुरू होती. या कालावधीत तालुक्यातील शेतकऱ्यांचा एक लाख ७८ पाचशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यापोटी शेतकऱ्यांना ९७ कोटीची रक्कम अदा करण्यात आली आहे. तदनंतर कोविड-१९ मुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याने कापूस खरेदी बंद झाली होती. 

शासनाच्या १७ एप्रिलच्या पत्रानुसार कोरोना संदर्भात विषेश काळजी घेऊन कापूस खरेदी करण्यास परवानगी दिली. त्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी संबंधितांची बैठक घेत करून आवश्यक ते मार्गदर्शन व सूचना दिल्या. जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांच्यामार्फत कापूस विक्रीसाठी शिल्लक असलेल्या दोन हजार ३७३ शेतकऱ्यांची यादी बाजार समितीस उपलब्ध करून दिली होती. 

बोगस नावांचा केला पंचनामा 
उपलब्ध झालेल्या यादीनुसार बाजार समितीने ४ मे पासून प्रत्यक्षात कापूस खरेदी पुर्ववत सुरू केली. खरेदी सुरू असताना उपलब्ध यादीत काही नावे बोगस असल्याचे निर्दशनास आल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी २६ मे ला खरेदी केंद्रास दिलेल्या भेटीत समितीचे सभापती सुनील पाटील यांनी उपलब्ध असलेल्या यादीचा गावनिहाय तलाठींमार्फत पंचनामा करून देण्याबाबत विनंती केली असता जिल्हाधिकारींनी त्याचक्षणी जागेवरच पंचनामा करण्याबाबत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सांगितले. 
 
नव्या याद्यांमुळे खरेदी सुरळीत 
डॉ. कुलकर्णी यांनी पंचनामा करून बाजार समितीस नव्याने याद्या उपलब्ध करून दिल्यात. ज्यामध्ये बरीचशी बोगस नावे कमी झालेली होती. यामुळे पुढील कापूस खरेदी सुरळीत पार पडली. २२ जूनला सायंकाळपर्यंत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. लॉकडाऊननंतर ५१ हजार पाचशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यापोटी शेतकऱ्यांना २८ कोटी रक्कम अदा करण्यात आली आहे.अशी एकूण कापूस खरेदी दोन लाख तीस हजार क्विंटल झाली असून १२४ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात परस्पर जमा झाली आहे. 
जिल्हाधिकारी डॉ. भारूड, जिल्हा उपनिबंधक चाळक, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसिलदार डॉ. कुलकर्णी व सहाय्यक निबंधक श्री. चौधरी यांनी वेळोवेळी खरेदी केंद्रास भेट देत मार्गदर्शन केले आहे. सीसीआयचे केंद्रचालक अरूण भाडाईत, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल व राधिका कॉटनचे कैलास पाटील यांनी खरेदीसाठी सहकार्य केले. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक 
सर्व प्रशासकीय घटकांचे बाजार समितीचे मार्गदर्शक संचालक दीपक पाटील व समितीचे सभापती पाटील यांनी अभिनंदन केले. समितीचे सचिव व इतर कर्मचाऱ्यांनी खरेदी कामी मेहनत घेतल्याबद्दल कौतुक केले आहे. राज्यात तालुका पातळीवर कमी कालावधीत सर्व कापूस खरेदी करणारी बाजार समिती म्हणून जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी विशेष पत्राव्दारे बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, सर्व संचालक तसेच सीसीआयचे भाडाईत यांचे अभिनंदन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com