राजकीय मंडळींनो, हे वागण बरं नव्हं..!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political leader figical distncy

एकाचवेळी एवढ्या जबाबदार मंडळींनी एकत्र येणं किती योग्य आहे? उद्या काही अघटित घडलं तर जिल्ह्याच्या जनतेने कोणाकडे पहावं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राजकीय मंडळींनो, हे वागण बरं नव्हं..! 

शहादा : एकीकडे प्रशासन रात्रंदिवस कोरोनावर मात करण्यासाठी झटत आहे. तर दुसरीकडे विकास कामांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनीच फिजिकल डिस्टंन्सींगचा फज्जा उडविल्याचे चित्र शहादा तालुक्यात पहावयास मिळाले आहे. दरम्यान, त्या दिवशी कायर्क्रमाला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याचा अहवालही पॉजिटिव्ह आला होता. त्यामुळे याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

राणीपूर (ता.शहादा) येथे शासनाने कोटी रुपये खर्च करुन अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. या केंद्राचे उद्‌घाटन मागील आठवड्यात झाले. उद्‌घाटनप्रसंगी पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी, खासदार हिना गावित, जि.प. अध्यक्षा सीमा वळवी यांचेसह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकारी, मंत्री, खासदार, जि. प. सभापती, पंचायत समितीचे पदाधिकारी व बहुतेक बडे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या संकट काळात शासन व प्रशासन नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत आहे; असे असतांना केवळ विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी राणीपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्‌घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधींकडून फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. 

कितपत आहे याची गरज
एकाचवेळी एवढ्या जबाबदार मंडळींनी एकत्र येणं किती योग्य आहे? उद्या काही अघटित घडलं तर जिल्ह्याच्या जनतेने कोणाकडे पहावं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकप्रतिनिधींच्या अशा वागण्यामुळे "लोकांसांगे ब्रह्मज्ञान..." या उक्तीप्रमाणे सामान्य जनतेला संदेश देत आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 
विकास कामांचे उद्‌घाटन करणे आवश्यक असते का? आवश्यकच असेल तर अशा आणीबाणीच्या प्रसंगी उद्‌घाटन ऑनलाइन करता आले असते. आपल्या सोबतच सामान्य लोकांचा जीव धोक्यात घालणे हे उचित आहे कां? असे अनेक प्रश्न राणीपुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त उपस्थित होत आहे.

संपादन : राजेश सोनवणे

Web Title: Marathi News Shahada Political Leader Not Follow Figical Distancy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top