कर्ज काढत रूग्‍णसेवेसाठी उपलब्‍ध केली रूग्णवाहिका; युवकांचे कार्य 

कमलेश पटेल
Sunday, 18 October 2020

सहा युवकांनी हम साथ साथ है म्हणत आणलेली रुग्णवाहिका काहीशा अल्पदरात ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. 

शहादा (नंदुरबार) : कोविड-१९ मुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. यासाठी शहरातील सहा युवकांनी एकत्र येऊन श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली. ना नफा ना तोटा या तत्वावर जनसेवेसाठी अल्प दरात उपलब्ध होणार आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रमेशचंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. 
शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. राजेंद्र चौधरी, कल्पेश पटेल, मोतीलाल जैन, ललित छाजेड, प्रवीण खिवसरा व समीर जैन या सहा युवकांनी एकत्र येऊन व श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली. आज तिचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महावीर पतसंस्थेचे कार्याध्यक्ष पारसकुमार देसरडा ,विनयचन्द्र गांधी, रमेश खिवसरा, मोहनलालजी चोरडिया, रमेश छाजेड, राजेश पटेल ,महावीर पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र जैन, संचालक राजाराम पाटील, विजय भावसार ,अनिल भंसाली, गोवर्धन जैन ,पिनाकीन पटेल ,बापू तिरमले विविध संस्थेचे संचालक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

लॉकडाउनमध्येही केली होती मदत
लॉकडाऊनचा काळातही या सहा युवकांनी हातावर पोट भरणाऱ्या अनेकांचा रोजगार बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. अशा गरजू कुटुंबांना अन्न, वैद्यकीय सेवा पुरवण्याचे समाजाभूमिक कार्य यांच्यावतीने करण्यात आले होते. 

अल्प दरात उपलब्ध 
सध्या कोविड-१९ च्या काळात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. झाली तरी काही खासगी रुग्णवाहिकेकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दर आकारला जात असल्याचे चर्चिले जात होते. सहा युवकांनी हम साथ साथ है म्हणत आणलेली रुग्णवाहिका काहीशा अल्पदरात ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. 

"कोरोना व्हायरस या महामारीत गेल्या काही महिन्यात रुग्णांना उपचारादरम्यान बाहेर गावी नेण्यासाठी बऱ्याच वेळा ॲम्बुलन्स उपलब्ध झालेल्या नाहीत. जनसेवा लक्षात घेता ना नफा ना तोटा या तत्वावर अद्यावत कार्डियाक ॲम्बुलन्स आणण्याच्या मानस हम साथ साथ है या सहा मित्रांनी विचार केला आणि आज तो लोकार्पण सोहळा करण्यात आलेला आहे." 
- कल्पेश पटेल, शहादा 

ीसंपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada six friend loan and available ambulance