esakal | आली रे आली... आता मॅचींग मास्कची फॅशन आली; पैठणीची झालर अन् कार्टूनची चित्र !
sakal

बोलून बातमी शोधा

color-mask

दररोज नवीन मास्क वापरणे हे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे अनेक जण पुन्हा वापरता येतील असे मार्क्स खरेदी करण्यास पसंती देत आहेत.

आली रे आली... आता मॅचींग मास्कची फॅशन आली; पैठणीची झालर अन् कार्टूनची चित्र !

sakal_logo
By
निलेश पाटील

शनिमांडळ : कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे सर्वांची जीवनशैली बदलून गेली आहे. चैनीच्या वस्तू घेण्याची क्रेझच देखील कमी झाली आहे हे वर्ष फक्त कोरोना शी लढा देण्याचे आहे. अशी भावना आता सर्वांमध्येच रुजली आहे. सध्या सर्वत्र मास्क  सेनेटायजर आणि फिजिकल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अंगीकार करूनच वावरावे लागत आहे.मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधनकारक झाले आहे त्यामुळे मार्केटमध्ये मास्क ची नवं नवीन व्हरायटी पाहायला मिळत आहे.त्यामुळे मार्क्स हा आता फॅशन स्टेटस बनत चालला आहे.काही ठिकाणी मॅचिंग मास्क शिवून मिळेल अशा पाट्या झळकत आहेत.

कोरोना जाईपर्यंत मास्क हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.तोंडावर मास्क नसेल तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळत नाही.सुरुवातीला कॉटनच्या कपड्यातील मास्क विक्रीस होते गरज म्हणून नागरिकांनी त्याची खरेदी करत होते.


दररोज नवीन मास्क वापरणे हे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे अनेक जण पुन्हा वापरता येतील असे मार्क्स खरेदी करण्यास पसंती देत आहेत मास्क लावल्यानंतर चेहरा अर्धा झाकला जातो त्यामुळे पहिले लक्ष हे कपडे यापेक्षाही चेहऱ्यावरील मास्ककडे जाते त्यामुळे नवनवीन डिजाईनचे मास्क वापण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.

"मार्क्सला पैठणीची झालर "
महिलांमध्ये रंगीबिरंगी फुलांच्या डिझाईन च्या मास्क ची केझ वाढत आहे.यामध्ये लग्नसराई साठी खास पैठणी पासून बनवलेले मास्क सध्या मार्केट मध्ये आकर्षण ठरत आहे.काही ठिकाणी मॅचिंग मास्क शिवून मिळेल अशा पाट्या बाजारात लावलेल्या दिसत आहेत.हे बघून महिलांची गर्दी होत आहे त्यामुळे महिला आपल्या साडी,ड्रेसवर मॅचिंग होतील असे मास्क मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.विविध डिजाईनचे मास्क तयार करून देण्याच्या जाहिराती देखील सोशल मीडियावर फिरत आहेत.

"लहान मुलांची पसंती कार्टूनच्या मास्कला
विविध व्हरायटीसोबत महिलांसाठी पैठणीच्या कापडाचे तसेच लहान मुलांसाठी कार्टून चे मास्क उपलब्ध आहेत.मास्क ची किंमत 30 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत आहे.लग्नसराई साठी विशेष पैठणीच्या मास्कला खूप मागणी सध्या असल्याची माहिती टेलर व्यवसायिकांनी दिली. 
 

संपादन - भूषण श्रीखंडे