शिंदखेड्यात इतक्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत . त्यात यापूर्वी पाच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले असून, उर्वरित 58 ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत आहे. त्या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत . त्यात यापूर्वी पाच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले असून, उर्वरित 58 ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 
शिंदखेडा तालुक्‍यात मुदत संपणार ग्रामपंचायतींवर नव्या निर्णयानुसार आगामी सहा महिने प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. राज्यातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलली आहे. मुदत संपलेल्या म्हळसर- वडोदे विकवेल ग्रुप ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी सुदाम मोरे, रहिमपुरे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कृषी विस्तार अधिकारी संजय जगदेव, झोटवाडे ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी पी. के. सावंत, वडदे ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी एस. के. सावकारे व साहूर ग्रामपंचायतीवर कृषी विभागाचे विस्ताराधिकारी डी. बी. पाटील यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. आता 58 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. 

होणार प्रशासक नियुक्ती 
अजंदे बुद्रुक, अजंदे खुर्द, अक्कडसे, अलाणे, बाभुळदे, बाह्मणे, अमराळे, बेटावद, चौगाव खुर्द, चिमठावळ, दलवाडे (प्र.नंदुरबार), दरखेडा, दसवेल दत्ताणे, दिवी, डाबली, डांगुर्णे- सोंडले, धमाणे, धावडे, धांदरणे, हातनूर, हिसपूर, हुबंर्डे- वडली, जखाणे, जसाणे, जातोडा, कामपूर, कर्ले, जुने कोडदे, कुंभारे (प्र.नंदुरबार), खलाणे, लोहगाव-वसमाने, लंघाणे, महाळपूर, मंदाणे, मेलाणे, मुडावद-भिलाणे दिगर, सवाई- मुकटी, निरगुडी, निशाणे, पढावद, परसोळे, रंजाणे, रेवाडी, सार्वे, सोनेवाडी, सोनशेलू, सुकवद, सुलवाडे, सुराय- कलवाडे-अक्कलकोस-कलवाडे, तामथरे, तावखेडा (प्र.नंदुरबार)- चावळदे-शेंदवाडे, टेंमलाय , वरूळ-घुसरे, विखुर्ले, विरदेल, झिरवे व नवे कोडदे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda 58 gram panchayat Administrator