
शेतकरी, कामगार, छोटे उद्योग पती यांच्या विरोधातील भाजप सरकार असून मोठया उद्योग पतींचे हे सरकार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण खानदेशात काँगेसचे ताकद वाढेल.
शिंदखेडा ः इंग्रजांपेक्षाही शेतकऱ्यांविरुद्ध काळे कायदे करणारे केंद्रातील भाजप सरकार आहे. शेतकरी विरोधी व शेतकऱ्यांचे हित न साधणारे हे सरकार असल्याची टिका आदिवासी कल्याण मंत्री के. सी. पाडवी यांनी केले.
आवश्य वाचा- लोकांच्या सुरक्षेसाठी गमावला स्वतःचा जीव
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी धोरण विरोधात शिंदखेडा तालुका कॉंग्रेयाच्या वतीने भव्य ट्रॅकटर रॅलीचेआयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खाजदर बापू चौरे, माजी आमदार डी एस आहिरे, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा इंटक कॉंग्रेस चे प्रमोद सिसोदे, शिंदखेडा काँग्रेसचे गटनेते दीपक देसले, नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक आहिरे, चंद्रकांत सोनावणे,
हेमराज पाटील ,अलोक रघुवंशी, दरबरसिंग गिरासे आदी उपस्थित होते
शेतकरी, कामगार, छोटे उद्योग पती यांच्या विरोधातील भाजप सरकार असून मोठया उद्योग पतींचे हे सरकार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण खानदेशात काँगेसचे ताकद वाढेल व सर्व खाजदर काँग्रेसचे राहतील असा विश्वास मंत्री पाडवी यांनी व्यक्त केला शिंदखेडा तालुक्यात शाम सनेर यांना न्याय दिला जाईल असेही ते म्हणाले.
केंद्र सरकार हे अदाणी आणि अंबाणीचे आहे 80 टक्के शेतकरी ग्रामीण भागाचा आहे. त्यांच्या विरोधात केंद्र सरकार विधायक आणत असून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले.
सी सी आय कापूस केंद्राचे श्रेय आमदार रावल विनाकारण घेत आहेत असे शाम सनेर यांनी सांगितले शिंदखेड्या साठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती हवी अशी मागणी त्यांनी केली सर्व सत्ता केंद्र रावल दोंडाईचा येथे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
आवर्जून वाचा- म्हणूनच सोनिया गांधींची शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेस सहमती : ॲड. के. सी. पाडवी
ट्रॅक्टर रॅलीला चांगला प्रतिसाद
येथील एस एस व्ही पी एस कॉलेज येथील रॅलीस सुरवात झाली केंद्र सरकार विरोधाचे प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली स्टेशन रोड, शिवाजी चौक, गांधी चौक, माळीवाडा, भगवा चौक व बीजसनी मंगल कार्यालय येथे रॅलीचे सांगता करण्यात आली साधारण दोन किलोमीटर व जवळ जवळ तीनशे ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होते.
संपादन- भूषण श्रीखंडे