esakal | सायरनवर पाल बसली अन् आवाजाने साऱेच पळत सुटले 
sakal

बोलून बातमी शोधा

central bank

सायरनवर पाल बसली अन् आवाजाने साऱेच पळत सुटले 

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : दुपारचे चार वाजलेले... अचानक स्मारक चौकात सायरनचा जोरदार आवाज सुरू होतो... अन् बॅंकेतील ग्राहकांसह परिसरातील सारेच नागरिक सैरावैरा पळत सुटले... काही तरी अघटित घडले की काय या भीतीने साऱ्यांचाच काही वेळ गोंधळ उडाला. मात्र बॅंकेत जाऊन चौकशी केल्यावर कळाले की बॅंकेत काहीही झालेले नाही. त्यानंतर मात्र नागरिकांनी सुटकेचा निः श्‍वास सोडला. 

शहरातील स्मारक चौकात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखेचा इमर्जन्सी हॉर्न (सायरन) भरदुपारी चार वाजता अचानक वाजला. भर बाजारात असलेल्या नागरिकांची पळापळ झाली. सर्वत्र गोंधळ उडाला. त्यामुळे परिसरात काय झाले... काय झाले, अशी विचारणा करीत कुतूहलाचा विषय बनला होता.मात्र ज्यावेळेस इमर्जन्सी हॉर्न विदाऊट इमर्जन्सी वाजल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. 

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची तळोदा शाखा स्मारक चौकात आहे .या बँकेच्या इमर्जन्सी हॉर्न अचानक वाजला. काल (ता. ८) शनिवार , सुट्टीचा दिवस असल्याने व हॉर्न वाजल्याने गोंधळ वाढला . स्मारक चौकात उभ्या असलेल्या हात गाडीधारक विक्रेत्यांनी बँकेचा कर्मचाऱ्यास फोन करून हॉर्न वाजत असल्याचे कळविले . तेव्हा कर्मचाऱ्याने कोणतीही भिती न ब ळगता अत्यंत बिधास्तपणे तिकडून फोन करणाऱ्यास उतर दिले की, वीस मिनिटात हॉर्न आपोआप बंद होईल. आणि तसेच झाले. वीस मिनिटात तो हॉर्न बंद झाला. मात्र नागरिकांमध्ये त्याची चर्चा सुरू होती. दरम्यान या बँकेचे इमर्जन्सी हॉर्न वाजण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे त्यांना हा अऩुभव नवीन नाही. मात्र तेथे उपस्थित असलेले उत्तर नागरिकांचा मते हॉर्न तेव्हाच वाजतो. जेव्हा काहीतरी अघटित घटना घडते. त्यामुळे काही तरी घडले असावे म्हणून ज्यांना त्याबाबत माहिती नाही . ते मात्र सैरावैरा पळत सुटले. त्यातून अनेकांसाठी तो विनोदही झाला. जेव्हा त्याचे कारण कळाले. बॅंकेचा कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार इमर्जन्सी हॉर्न असलेल्या सिस्टीमवर पाल अथवा उंदीर जरी आला तरी हॉर्न वाजतो, अशी माहिती मिळाली. 

loading image
go to top