नंदुरबारमध्ये भाजप, मनसेला खिंडार; अनेकांनी बांधले हातावर शिवबंधन

आंदोलनाचे हत्यार उपसून शिवसेनेला तळोद्यात मजबूत स्थान निर्माण करून ठेवले आहे
नंदुरबारमध्ये भाजप, मनसेला खिंडार; अनेकांनी बांधले हातावर शिवबंधन

तळोदा ः भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व मनसेचे तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ११) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे तळोद्यात मनसेला अक्षरशः खिंडार पडले असून भाजपमधील स्थानिक नेत्यांच्या राजकारणामुळे (Political) भाजप (BJP) जिल्हा उपाध्यक्ष पुन्हा स्वगृही परतले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान तळोदा नगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे मात्र काही महिन्यांपासून शहरात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे आगामी पालिका निवडणूक नक्कीच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहे. (taloda bjp and mns office bearers from join shiv sena)

नंदुरबारमध्ये भाजप, मनसेला खिंडार; अनेकांनी बांधले हातावर शिवबंधन
शिवसेना स्टाईलने वागा कोणी अडविणार नाही !


भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार यांनी पालिका निवडणूक भाजपकडून लढवली होती. तर यापूर्वी २०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कोमल सोनार या सेनेच्‍या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यात आनंद सोनार यांनी मागच्या पालिका निवडणूक पूर्वी सेनेच्या त्याग करीत भाजपत प्रवेश केला होता. शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे व इतर पक्ष पदाधिकाऱ्यांनी शहरातील जनतेशी निगडीत प्रश्नांना वारंवार हात घालत आंदोलनाचे हत्यार उपसून शिवसेनेला तळोद्यात मजबूत स्थान निर्माण करून ठेवले आहे. त्यामुळेच शिवसेनेत पदाधिकारी तरुणांची फळी सामील झाली असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशावेळी कृषी मंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, रुपसिंग पाडवी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी हाती बांधले शिवबंधन..

शिवसेनेचे खासदार संजय राऊत नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात तळोद्यातील अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, मनसेचे तालुकाप्रमुख कल्पेश सूर्यवंशी, मनसेचे शहर प्रमुख सुरज माळी, उपशहर प्रमुख जयेश सूर्यवंशी, गणेश कर्णकार, सोनू वाघ आदी कार्यकर्त्यांनी आपल्या सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे.

नंदुरबारमध्ये भाजप, मनसेला खिंडार; अनेकांनी बांधले हातावर शिवबंधन
वरखेड्यात 'त्या' बिबट्याकडून हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीती !


भारतीय जनता पक्षाने कमी कालावधीत खूप काही दिले मात्र स्थानिक सत्ताधारी भाजप नेतृत्वाचा राजकारणामुळे व स्वीकृत नगरसेवक पदासाठी पैशांची मागणी झाल्याने त्यासाठी झालेल्या राजकारणाला कंटाळून भाजपला सोडचिठ्ठी देत माझ्या स्वगृही शिवसेनेत परत आलो आहे.
-आनंद सोनार, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com