दुर्गम भागातील कामांच्या पाहणीसाठी...आमदारांनी केली पाच किमीची पायपीट !.

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

आमदार पाडवी यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात येतील. केंद्र व राज्‍य शासनाच्या सर्व योजना आपल्या पर्यंत पोचवू असे सांगितले.

तळोदा : शहादा - तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील पाड्यांना भेट देऊन तेथील समस्यांबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. या भागात पोहोचण्यासाठी आमदार पाडवी यांना चक्क पाच किलोमीटर पायपीट करावी लागली, गाव व पाड्यांना भेट दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

शासकीय योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला व्हावा यासाठी आमदार पाडवी प्रत्येक गाव पाड्यात भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करीत समस्या जाणून घेत आहेत. यादरम्यान नागरिकांनी सुचवलेल्या विकास कामांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार रविवारी त्यांनी तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील माळखुर्दे, चिडमाळा, देवचौकडी यां ठिकाणी चक्क पाच किलोमीटर पायपीट करत जनतेचा समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी पाड्यावरची पिण्याच्या पाण्याची, दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याची, हायमास्ट लाईट, सोलर लाईट आधी विकास कामांची पाहणी केली. आपल्या भागात स्वतः आमदार आल्याने या गावातील गावकऱ्यांनी आमदारांशी बिनधास्तपणे चर्चा करीत दैनंदिन जीवन जगत असताना उद्भवणाऱ्या समस्याचा पाढा वाचला. 

यावर आमदार पाडवी यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात येतील. केंद्र व राज्‍य शासनाच्या सर्व योजना आपल्या पर्यंत पोचवू असे सांगितले. यादरम्यान आमदारांनी गावात शासन मार्फत वाटप झालेले धान्य पोहोचल्याची माहिती घेतली व आरोग विषयी चर्चा केली. वीरसिंग पाडवी, तळव्याचे नारायण ठाकरे, विठ्ठलराव बागले, प्रविण वळवी, गुड्डू वळवी, हिरामण दादा पाडवी, धारासिग वसावे, बोखादादा पाडवी, हितेश भाऊ, सोनु पाडवी, हर्षल वळवी आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda To inspect the works in remote areas, MLAs made a five km wokinge

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: