डीबीटी बंद करा आणि शासकीय खानावळ सुरू करा !

सम्राट महाजन
Friday, 28 August 2020

दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नाव बदलून ‘वीर एकलव्य’ स्वयंम योजना करण्यात यावे आणि वस्तू व स्टेशनरीची रक्कम वाढवण्यात यावी.

तळोदा ः जय आदिवासी युवा शक्तीच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डीबीटी योजना अभ्यासगटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांची भेट घेऊन डीबीटीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व मानसिक नुकसान आणि इतर मुद्यांवर सखोल चर्चा केली. तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पद्माकर वळवी यांना देण्यात आले. 

तळोद्यातील शासकीय विश्रामगृहात जय आदिवासी युवा शक्तीच्या महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डीबीटी योजना अभ्यासगटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, भोजन डीबीटी पूर्ण पणे बंद करून शासकीय खानावळ सुरू करण्यात यावे. आदिवासी विकास विभागा मार्फत ‘विद्यार्थी सहायता कक्ष’ स्थापन करण्यात यावे.

दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नाव बदलून ‘वीर एकलव्य’ स्वयंम योजना करण्यात यावे आणि वस्तू व स्टेशनरीची रक्कम वाढवण्यात यावी. यावेळी जयस महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विनोद माळी, उपाध्यक्ष डॉ. हिरा पावरा, संपर्क प्रमुख शंकर वसावे, दिनेश पावरा, प्रा. बबलू गायकवाड, बालाजी लाखाडे, विवेक पाडवी, अभय वळवी, शरद पोटकुले, कैलास मावची, निखिल घारे, साहिल भांगरे, वैभव बुळे, रितिक दलोड, चेतन शर्मा, योगेश पाडवी, साजन शेवाळे, सुनील पाडवी, दीपक भिल, अक्षय पाडवी, विक्की पवार, गौतम भिलाव, नागेश पावरा, प्रेम पाडवी, दिनेश मोरे आदी उपस्थित होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Jay Adivasi Yuva Shakti the member bearers met the chairman of the DBT scheme and made various demands