ग्रामस्‍थांच्या श्रमदानातून बोडका झालेल्या डोंगरावर फुलली हिरवळ !

युवकांनी एकत्र येत हरणखुरीचा परिसर पुन्हा एकदा हिरवागार करण्याच्या प्रयत्न चालविला
ग्रामस्‍थांच्या श्रमदानातून बोडका झालेल्या डोंगरावर फुलली हिरवळ !

तळोदा ः ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय धडगाव तालुक्यातील हरणखुरी गावात येतो. गावातील (Villege) नागरिकांनी (citizens) श्रमदानातून बोडका होत चाललेल्या डोंगराला पुन्हा हिरवागार करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा असा संदेश दिला. जंगल (Forest) वाढल्याने परिसरात विविध पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यातून पर्यावरणाचा (citizens) समतोल राखण्याचा प्रयत्‍न केला आहे.
(villagers come together plant trees mountain green)

ग्रामस्‍थांच्या श्रमदानातून बोडका झालेल्या डोंगरावर फुलली हिरवळ !
धुळे जिल्ह्यात १२२ गावांनी कोरोनाला थोपविले वेशीबाहेर

हरणखुरी (ता. धडगाव) येथे पूर्वी विपुल प्रमाणात जंगलसंपदा होती. कालांतराने हळूहळू ती पूर्णतः नष्ट झाली. परिसरातील नागरिक विशेषतः युवकांनी एकत्र येत हरणखुरीचा परिसर पुन्हा एकदा हिरवागार करण्याच्या प्रयत्न चालविला असून, त्यांना यश येत आहे.

श्रमदानातून परिसर हिरवा
पाच वर्षांपूर्वी हरणखुरी गावातील व वन विभागाचे जवळपास ६५ हेक्टर क्षेत्र पूर्णतः ओसाड झाले होते. नष्ट होत गेलेली संपदा नागरिकांनी डोळ्यांनी बघितली. त्यामुळे निसर्गाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी २०१५-१६ मध्ये तरुणांनी पुढाकार घेतला व गावात गावसभा घेत परिसरातील डोंगरांचे संरक्षण करण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वप्रथम काही नियम तयार करीत वन समिती स्थापन करण्यात आली. नंतर कागदपत्रांची पूर्तता करीत वन विभागाच्या ताब्यातील या जागेवर वृक्षारोपण करण्याची परवानगी वन विभागाकडून घेण्यात आली. पहिल्या वर्षी सर्व तरुणांनी श्रमदानातून सात हजार रोपे लावली. आजपर्यंत महू, बांबू, आवळा, चिंच, सीताफळ, लिंब अशी विविध प्रकारची जवळपास २५ हजार रोपे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. सुरवातीला डोंगरांवरील रोपांच्या रक्षणाची जबाबदारी तरुणांनी घेतली. नंतर रखवालदार ठेवत वनउपजातून मिळालेल्या उत्पन्नातून रखवालदाराला मानधन देण्यात आले. परिसरात आता हजारोंच्या संख्येने वृक्ष वाढल्याने प्राणीही वाढले आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येत पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.

ग्रामस्‍थांच्या श्रमदानातून बोडका झालेल्या डोंगरावर फुलली हिरवळ !
जळगाव जिल्ह्यात बारा लाख वृक्ष लावले जाणार !

मागील पाच वर्षांपासून डोंगरांच्या रक्षणासाठी सर्व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. आता या परिसरात हजारोंच्या संख्येने झाडे दिसून येत आहेत. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने विविध पक्षी, प्राण्यांचे अस्तित्व पुन्हा जाणवायला लागले आहे.
-राकेश पावरा, सदस्य, वन समिती, हरणखुरी

काही वर्षांपूर्वी हरणखुरीचा डोंगरांवर बोटावर मोजण्याइतकीच आणि तीही काटेरी झुडपे शिल्लक होती. त्यामुळे डोंगर अक्षरशः बोडका दिसत होता. मात्र, ग्रामस्थ व वन समितीच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचे कार्य झाल्याने आता परिस्थिती बदली आहे.
-अर्जुन पावरा, सदस्य, वन समिती, हरणखुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com