esakal | मजूरीसाठी घरातून "त्या' निघाल्या...आणि उसाच्या शेतात मृत सापडल्या ! 
sakal

बोलून बातमी शोधा

मजूरीसाठी घरातून "त्या' निघाल्या...आणि उसाच्या शेतात मृत सापडल्या ! 

कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, मटावल (ता. कुकरमुंडा) शिवारातील प्रल्हाद उदेसिंग पाडवी यांच्या उसाच्या शेतात त्या मृतावस्थेत आढळून आल्या.

मजूरीसाठी घरातून "त्या' निघाल्या...आणि उसाच्या शेतात मृत सापडल्या ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळोदा  : मजुरीसाठी जाणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला रस्त्यात गाठून तिला ठार मारल्याची घटना गणेश बुधावल (ता. तळोदा) येथे बुधवारी घडली. दरम्यान, या महिलेच्या अंगावरील दागिने गायब आहेत. दागिन्यांसाठीच खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

गणेश बुधावल (ता. तळोदा) येथील नमूबाई नरशी वसावे (वय ५५) या बुधवारी (३ जून) सकाळी नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामावर गेल्या. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने, कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, मटावल (ता. कुकरमुंडा) शिवारातील प्रल्हाद उदेसिंग पाडवी यांच्या उसाच्या शेतात त्या मृतावस्थेत आढळून आल्या. याबाबत जयवंत नरशी वसावे (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलच्या अंगावरील दागिने गायब 
दरम्यान, मृत नमूबाई ही कामावर गेली, तेव्हा तिच्या अंगावर सहा हजारांची तीन ग्रॅमची नाकातील सोन्याची नथ, चार हजारांची दोन ग्रॅमचे कानातील सोन्याची कर्णफुले जोडी, आठ हजारांचे २० तोळ्यांची चांदीची साखळी, आठ हजारांचे २० तोळ्यांच्या पाटल्यांची जोडी, सात हजारांची १८ तोळ्यांच्या चांदीच्या सहा बांगड्या, असा सुमारे ३३ हजारांचे दागिने होते. मात्र, त्या मृतावस्थेत आढळल्या, तेव्हा त्यच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दागिन्यांसाठी गळा दाबून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे तपास करीत आहेत. 

अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट 
दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, पोलिस नाईक दिनकर घुले, अजय पवार, वनसिंग पाडवी, पंकज पाडवी, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक योगेश राऊत, युवराज चव्हाण, सुनील पाडवी यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. 

घटनास्थळी श्वान पथकासही पाचारण केले होते. मात्र, पावसामुळे चौकशीदरम्यान अडथळे आले, तसेच अंगुली मुद्रातज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. टी. पावरा, तसेच फॉरेन्सिक पथकाचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक दिनेश लाडकर, सहाय्यक रासायनिक विश्लेषक संजय रामोळे, पोलिस शिपाई चेतन चौधरी, साबीर पिंजारी आदींनी बुधवारी रात्री अकरा व आज दुपारी तीनला घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीजन्य पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केला. 
 

loading image
go to top