पाण्याची टाकी फुटून चार मजुरांचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

नाशिक : सातपूर परिसरातील कार्बन नाका भागातील ध्रुवनगर येथे नव्याने सुरू असलेल्या सम्राट ग्रुपच्या "अपना घर' बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरांसाठी बांधण्यात आलेली पाण्याची 15 हजार लिटर क्षमतेची टाकी फुटली. या टाकीजवळच आंघोळ व कपडे धुण्यासाठी असलेल्या मजुरांच्या अंगावर टाकीचा मलबा पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यु झाला तर, गंभीर जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना आज सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक : सातपूर परिसरातील कार्बन नाका भागातील ध्रुवनगर येथे नव्याने सुरू असलेल्या सम्राट ग्रुपच्या "अपना घर' बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरांसाठी बांधण्यात आलेली पाण्याची 15 हजार लिटर क्षमतेची टाकी फुटली. या टाकीजवळच आंघोळ व कपडे धुण्यासाठी असलेल्या मजुरांच्या अंगावर टाकीचा मलबा पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यु झाला तर, गंभीर जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना आज सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर प्रसार माध्यमांना प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच रोकण्यात आले तर जिल्हा रुग्णालयातही मृतांच्या नातलगांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येऊन एकप्रकारे मजुरांची मुस्कटदाबी करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, पोलीसांनी संबंधितांना सुनावल्याने त्यांनी काढता पाय घेतला. 

या घटनेमध्ये अब्दुल बारीक (30, रा बिहार), बेबी सनबी खातून (25, रा. पश्‍चिम बंगाल), सुदाम गोहीर (19, रा. ओरिसा) यांचा जागीच मलब्याखाली दबल्याने मृत्यु झाला तर, खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अनामी धना चंदन (50, रा. दिल्ली) यांचा मृत्यु झाला. तर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी मोहम्मद मझर अल्लाउद्दीन (30) याच्यावर उपचार सुरू असून आणखी काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
सातपूरच्या कार्बननाका परिसरातील ध्रुवनगर येथे बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांच्या सम्राट ग्रुपच्या माध्यमातून बहुमजली "अपना घर' गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे.

   याठिकाणी परराज्यातील बांधकाम मजुरांना कामासाठी आणण्यात आले आहे. त्यांच्यासाठी याठिकाणी नैसर्गिक नाल्याच्या कडेला पाण्याच्या दोन टाक्‍या बांधण्यात आल्या होत्या. या पाण्याच्या टाक्‍यांची क्षमता प्रत्येकी 15 हजार लिटर होती. तर पाण्याच्या टाक्‍या या विटा-सिमेंटच्या बांधकामात महिनाभरापूर्वीच बांधल्या होत्या. दरम्यान, या टाक्‍यातून पाण्याची गळती होत होती. त्यासंदर्भात काही मजुरांनी सम्राट ग्रुपच्या व्यवस्थापकाकडे तक्रारही केली होती. तसेच, एका दिवसाचे आंदोलनही केले होते. संबंधितांनी मजुरांची मुस्कटदाबी करत त्यांचे आंदोलन दडपले होते. 

दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस होतो आहे. तर सोमवारी (ता.1) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे महिनाभरापूर्वीच बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीखालील माती ढासळत गेली. तसेच टाकीमध्येही क्षमतेपेक्षा अधिक पाणी आणि त्यातही गळती असल्याने आज सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान टाकी फुटली. त्यावेळी काही मजुर हे पाण्याच्या टाकीजवळ आंघोळ करीत होते तर महिला कपडे धूत होती. त्यांच्याच अंगावर टाकीचा मलबा पडल्याने त्यात त्यांच्या अंगावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला तर, रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेत असताना एका मजुराचा मृत्यु झाला. या जखमी झालेल्यांना नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता, अनामी चंदन यांचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्हा रुग्णालयात एक जखमी मजूर मोहम्मद अल्लाउद्दीन यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

अग्निशमन दलाने केले बचावकार्य 
घटनेची माहिती मिळताच सातपुर अग्निशमन उपकेंद्राचा बंब जवानांसह घटनास्थळी दाखल झाला. चीफ स्टेशन ऑफिसर चंद्रकांत भोळे, लिडिंग फायरमन प्रवीण परदेशी संजय तुपलोंढे, अशोक मोरे, रमाकांत खरे, जगदीश गायकवाड, महेश बागुल यांनी बचावकार्य सुरू करत मलब्याखाली दबलेल्या तिघांना जीवंत बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत मृत झालेल्या बेबी सनबी खातून यांना लहान चार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tank collepse

फोटो गॅलरी