शिक्षक-भरती उमेदवारांच्या आशेला 'पवित्र' पोर्टलचे ग्रहण! ''लॉक किया जाय!' ऑप्शनच नाही!

वैभव तुपे
मंगळवार, 28 मे 2019

तळेगाव : आठ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. तरीही या पोर्टल वरच्या तांत्रिक अडचणी मात्र संपायलाच तयार नसल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. लवकरात लवकर पवित्र पोर्टल वरच्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण उमेदवारांकडून करण्यात येत आहे. 
   
राज्यातली रखडलेली शिक्षक भरती सुरू व्हायला नोकरीसाठी इच्छुक डी.एड, बी. एड धारक उमेदवारांना तब्बल आठ वर्षे वाट पाहावी लागली आहे. त्यातही 2013 नंतर शिक्षकाच्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे राज्य शासनाने बंधनकारक केल्याने नोकरीच्या आशेवर असलेल्या उमेदवारांनी टीईटी परीक्षेचा टप्पाही पार केला. आता 2010 पासून बंद असलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू करण्याची तयारी राज्य शासनाने केली असली तरी पवित्र पोर्टल च्या रूपाने पुन्हा त्यात खोडा बसला आहे.
   
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची 31 मे ही शेवटची मुदत आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या पात्रतेनुसार पोर्टल वर ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात असून त्यात नोकरीसाठी उपलब्ध पर्याय प्राधान्य क्रमाने निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे सगळे पर्याय निवडून झाल्यानंतर ते सिस्टीम मध्ये लॉक करणे गरजेचे आहे. जोपर्यंत हे पर्याय लॉक केले जात नाहीत तोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. मात्र सध्या पवित्र पोर्टलवरून हे लॉक करण्याचा पर्यायच दिसत नसल्याने सर्वच उमेदवारांची अर्ज करण्याची प्रक्रिया रखडली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news teacher pavitr portal