esakal | टायपिंगची टकटक सुरुच राहणार....
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

टायपिंगची टकटक सुरुच राहणार....

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत शासनमान्य टंकलेखन संस्थातून राबविण्यात येणारा मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम  ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली होती. मात्र शुक्रवारी ता. २३ शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने ३० नोव्हेंबर नंतरही मॅन्युअल टायपिंग अभ्यासक्रम सुरु राहाण्यास परवानगी दिल्याने राज्यभरातील शासनमान्य संस्थात मॅन्युअल टायपिंगची टकटक सुरुच राहणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कायालयातील कामकाजात संगणकाचा वापर तसेच शासनाच्या सर्व विभागामध्ये ई-गव्हर्नन्स, ई-ऑफिस पध्दत अवलंबण्याचे शासनाने स्विकारलेले धोरण 
विचारात घेऊन राज्यातील शासनमान्य वाणिज्य संस्थामध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय शासनाने ३१ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करत असताना मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम ता. ३० नोव्हेंबर, २०१५ पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

३० सप्टेंबर, २०१५ च्या शुध्दीपत्रान्वये मॅन्युअल 
टंकलेखन अभ्यासक्रमास ता. ३१ मे, २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यानंतर ता. १३ जुलै,२०१६ च्या शुध्दीपत्रान्वये मॅन्युअल टंकलेखन  अभ्यासक्रमास पुन्हा ता. ३१ मे, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यानंतरही ता.१६ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शासनमान्य लघुलेखन टंकलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगणक टंकलेखना सोबतच ता. ३० नोव्हेबर, २०१९ पर्यंत मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम 
सुरु ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती. तथापि, संगणक टंकलेखना सोबतच मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम नोव्हेंबर २०१९ नंतरही सुरू ठेवावा, अशी मागणी राज्य मॅन्युअल व संगणक टायपिंग संघर्ष समिती व काही संघटनांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनमान्य लघुलेखन टंकलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगणक टंकलेखना सोबतच मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 
त्या

   राज्यातील शासनमान्य लघुलेखन व टंकलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगणक टंकलेखना सोबतच मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम ३० नोव्हेंबर, २०१९ नंतरही सुरु ठेवण्यास शासनाने निर्णय घेतला असून त्याबाबत शासनाने शुक्रवार ता. २३ रोजी अध्यादेश काढून  नोव्हेंबर २०१९ नंतरही शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थामध्ये  मॅन्युअल टंकलेखना सोबतच संगणक टंकलेखनाचा अभ्यासक्रम सुरु राहाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याभरातील शासनमान्य टंकलेखन संस्थामध्ये टंकलेखन मशिनचा टकटकात सुरुच राहाणार आहे. दरम्यान नव्याने सुरु झालेल्या संगणक टायपिंग अभ्यासक्रम  (जीसीसी-टीबीसी) बरोबरच मॅन्युअल टायपिंग अभ्यासक्रमाचा (जीसीसी)  टकटकात पुन्हा सुरुच राहाणार असल्याने संस्थाचालक व विद्यार्थ्यांमध्ये समिश्र प्रतिक्रीया उमटत असून काहींनी निर्णयाचे स्वागत तर काहींनी नाराजी व्यक्त होत आहे.

loading image
go to top