residentional photo
residentional photo

युटीटी हंगाम तीनमध्ये गतविजेते दबंग दिल्ली भिडणार पुणेरी पलटनशी

नाशिक- दिल्लीत २५ जुलैपासून सुरु होत असलेल्या युटीटी टेबल टेनिसच्या तिसऱ्या हंगामाला सुरवात होत आहे. या हंगामातील पहिलीच लढत गतविजेत्या दबंग दिल्ली विरूद्द पुणेरी पलटन दरम्यान होत आहे. नावाजलेल्या खेळाडूंच्या सहभागामुले हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांशी भिडणार असून या सामन्यांबाबत उत्सुकता आहे.
   गतविजेते दबंग दिल्लीचा सध्याचा आघाडीचा आणि मानांकनातही आघाडी घेतलेला सथियान गणशेखरन (नं.२४) हा पुणे पलटनच्या उदयोन्मुख खेळाडूंशी लढणार आहे. टेबल टेनिस स्पर्धेतील हा सुरवातीचाच मुकाबला रंगतदार होईल,अशी अपेक्षा आहे.दबंग टिम हे अनुभवी आणि नावाजलेल्यांना घेऊन या स्पर्धेत उतरत आहे. त्यात रोमानियन बेरनाडिटी सिझॉक्स(नं.१९) आणि स्विडनचा जॉन परर्सिन(न.७२) आणि उदयोन्मुख खेळाडू पार्थ विरमानी यांचा समावेश आहे.
    पुणे पलंटनच्या संघाने आपले स्वतंत्र नियोजन केलेले आहे. त्यांच्या संघात च्युग चिह-यॉन या चीन तैपई(नं.२८) च्या खेळाडूसह जर्मनीच्या वेटरन सॅबीन विंटर(नं.६२) आणि भारतातील आघाडीचे खेळाडू अहिका मुखर्जी आणि हरमित देसाई  या  सुध्दा अव्वल खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय आणखी दोघांचा समावेश करून हा संघ आश्चर्यांचा धक्का देणार आहे. 
    चेन्नई लॉन्सच्या संघात दुसऱ्या दिवशी प्रवेश करणाऱ्या खेळाडूंमुळे अनेकांना झटकाच बसणार आहे. तो कशामुळे तर देशातील अव्वल अुभवी आणि नावाजलेला ३७ वर्षीय अचंता शेरथ कमाल(नं.३२) आणि जर्मन खेळाडू पेट्रीसा सोल्जाश्(नं.२६)  हे यु मुंब्राच्या संघातून इकडे ओढले गेले आहे.
मुंबईच्या संघात डो होई केम (नं.१२) या हॉगकॉंगच्या आणि सर्वात हुशार आणि चतुर मानव ठक्कर(२१ वर्षाखालील-नं.२) या खेळाडूंमुळे हा संघ लक्ष वेधणार आहे.
२०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समधील दोन सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली मनिका बात्रा, भारत( नं.५६) ही तिसऱ्या दिवशी उतरणार आहे. ती कोलकत्ताच्या आरपीएसजी मेवरिक्स या संघाकडून प्रतिनिधीत्व करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com