सप्तश्रृंगी गडावर अष्टमीनिमित्त भरला भाविकांचा महामेळा

दिगंबर पाटोळे,सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

वणी (नाशिक) : आद्य स्वंयभु शक्तीपीठ वणी गडावर शारदीय नवरात्रोत्सवातील आज दुर्गाष्टमी निमित्त आदिमायाच्या दरबारात भाविकांचा महामेळा भरला  आहे.

वणी (नाशिक) : आद्य स्वंयभु शक्तीपीठ वणी गडावर शारदीय नवरात्रोत्सवातील आज दुर्गाष्टमी निमित्त आदिमायाच्या दरबारात भाविकांचा महामेळा भरला  आहे.

आदिमायाचा सुरु असलेल्या नवरात्रोत्सवात आलेला आज रविवार सुट्टीचा दिवस व आई भगवतीचा अष्टमी उत्सव असा दुग्धशर्करा योग आल्याने चाकरमान्यांसह पदयात्रेकरु भाविकांनी गडावर दर्शनासाठी आज सकाळ पासून गर्दी केली असून भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या आहे. देवीची आजची पंचामृत महापूजा 
न्यायमुर्ती रणजीत मोरे यांचे हस्ते संपन्न झाली. यावेळी प्रधान जिल्हा न्यायाधिश जोशी, अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा सप्तशृंगी देवी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख, जिल्हा न्यायाधिश बोधनकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. आज देवीस लालरंगाची पैठणी नेसविण्यात आली होती. तर मुकुट, मयुरहार, वज्रटीक, गुलाबहार, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे, नथ, कर्णपुले, पाऊले असे आभुषणे चढवित साजशृंगार करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vani gad