पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती  उठविण्यासाठी राज्यपालांनाच पत्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरणगावसाठी 25 कोटी निधीतून महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र सरकार बदलताच या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी केली तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे योजना तत्काळ मंजुरीसाठी अखेर राज्यपालांना निवेदन दिले आहे. 
- सुनील काळे, नगराध्यक्ष वरणगाव. 

वरणगाव (जळगाव) : शहराची वाढती लोकसंख्या बघता युती सरकारच्या कार्यकाळात नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही. युती शासनाच्या कार्यकाळात गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र आघाडी सरकारने या योजनेला स्थगिती दिली आहे. नगराध्यक्षांनी पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवावी म्हणून थेट राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

वरणगाव शहरासाठी नागरिकांना 24 तास पाणी मिळावे यासाठी 25 कोटींची पाणीपुरवठा योजना माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 बाय 7 ही पाणीपुरवठा योजना 13 सप्टेंबरला मंजूर केली होती. या योजनेच टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली. नगरपरिषदेच्या खात्यावर सव्वा कोटीरूपयेही जमा झाले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी वरणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह औरंगाबाद उच्च न्यायालयात रिट पिटिशन क्रमांक 3275, 26 फेब्रुवारीला दाखल केली आहे. तसेच नागरिकांना आता उन्हाळ्यात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने जनतेचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहे, तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 25 कोटींची वरणगाव येथे मंजूर असलेली पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्यात यावी यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे इमेलद्वारे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news varangaon(jalgaon) Postponement of water supply scheme Letter to the Governor to pick up