वर्ध्यात सामाजिक संघटनांनी नोंदवला निषेध

राहुल खोब्रागडे
बुधवार, 3 जानेवारी 2018

वर्धा - कोरेगाव भीमा येथे शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या बहुजन बांधवांवर दगडफेक तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची निंदनीय घटना (ता. १) घडली. वर्धा येथे आंबेडकरी विचारधारेच्या विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करीत काल (ता. २) वर्धा येथे एकत्र येत आपला असंतोष व्यक्त केला होता. आज वर्धा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान वर्धा, देवळी, सेवाग्राम, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट येथेही घटनेचा निषेध करण्यात आला. आज वर्धा बंदला काही व्यवसायिकांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. तर जिल्यातील अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय व बाजारपेठा आज बंद करण्यात आपल्या होत्या.

वर्धा - कोरेगाव भीमा येथे शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या बहुजन बांधवांवर दगडफेक तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची निंदनीय घटना (ता. १) घडली. वर्धा येथे आंबेडकरी विचारधारेच्या विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करीत काल (ता. २) वर्धा येथे एकत्र येत आपला असंतोष व्यक्त केला होता. आज वर्धा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान वर्धा, देवळी, सेवाग्राम, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट येथेही घटनेचा निषेध करण्यात आला. आज वर्धा बंदला काही व्यवसायिकांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. तर जिल्यातील अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय व बाजारपेठा आज बंद करण्यात आपल्या होत्या. अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले तर वर्धा येथील रेल्वेस्थानकाजवळ एक दुचाकी जाळण्यात आली. 

भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव देशभरातून एकत्र जमले आहेत. परंतू विकृत प्रवृत्तीच्या काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक षडयंत्र रचून १ जानेवारीच्या कार्यक्रमावर हल्ला केला. या घटनेचा सर्व सामाजिक संघटना व बहुजन समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. समस्त बहुजन बांधवांनी एकत्रित येत वेगवेगळ्या संघटनांनी निषेधाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

Web Title: Marathi News Vardha Social Organizations protested