नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वटवट्याची वटवट

आनंद बोरा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

      नाशिक- हिवाळ्याची चाहूल लागताच गुलाबी थंडीत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यमध्ये अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत असून या वर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे या अभयारण्यात २६५ जातीचे पक्षी आढळतात मागील वर्षी आठ ते दहा नवीन पक्ष्यांची भर या यादीत पडली असून या वर्षी देखील अनेक नवीन पाहुणे येथे येत आहेत

  मजेशीर नावामुळेच चर्चेत

      नाशिक- हिवाळ्याची चाहूल लागताच गुलाबी थंडीत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यमध्ये अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत असून या वर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे या अभयारण्यात २६५ जातीचे पक्षी आढळतात मागील वर्षी आठ ते दहा नवीन पक्ष्यांची भर या यादीत पडली असून या वर्षी देखील अनेक नवीन पाहुणे येथे येत आहेत

  मजेशीर नावामुळेच चर्चेत

काळटोप खंड्या प्रथमच आढळा असून आता वटवट्या या जातीच्या पक्ष्याच्या पाच जाती येथे बघावयास मिळत असून यातील काही जातींचे तीस वर्षा नंतर दर्शन दिले आहे दंगाखोर वटवट्या,धन वटवट्या,पायमोज वटवट्या, आणि रेखांकित वटवट्या अशी त्याची मजेशीर नावे आहेत यातील धन वटवट्या हा पक्षी १९८९ मध्ये दिसल्याची नोंद वन विभागाच्या चेकलीस्ट मध्ये दिसून आली तब्बल तीस वर्षा नंतर हा पक्षी निरीक्षण मनोऱ्या जवळ बघावयास मिळाला. या पक्ष्यांची संख्या अभयारण्यात वाढल्याचे देखील दिसून आले त्यांचे खाद्य कीटक आणि ड्रेगोन फ्लाय ची संख्या या परिसरात वाढल्याने त्यांची संख्या वाढली असावी असे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे

पाकिस्तान,अफगाणिस्तानातून स्थलांतरित

     पायमोज वटवट्या हा मध्य रशियापासून पश्चिम चीन पर्यंत प्रजनन करतात आणि श्रीलंकेपर्यंत दक्षिणेस भारतीय उपखंडात हिवाळ्यासाठी स्थलांतर करतात. या पक्ष्याने पश्चिम आणि उत्तर फिनलँडच्या प्रजननाची सीमा पश्चिम दिशेने वाढविली आहे तर दंगाखोर वटवट्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उत्तर भारत मधील प्रजनन पक्षी स्थलांतरित आहेत आणि द्वीपकल्प भारत आणि श्रीलंका येथे हिवाळ्यासाठी ते स्थलांतर देखील करतात हे हळुवार, बडबड करणारे कीरेट-कीरेट-कीरेट असा आवाज काढणारे पक्षी आहेत हे सर्व पक्षी आकाराने लहान असले तरी त्यांच्या हालचाली थक्क करणाऱ्या आहेत इतके लहान पक्षी स्थलांतर करून येतात निसर्गाचा हा अनोखा खेळ न समजण्यासारखा आहे 

       आम्ही रोज अभयारण्या मध्ये पक्ष्यांच्या नोंदी घेत असतो या वर्षी स्थलांतरित पक्षी मोठ्या पावसामुळे उशिरा येण्यास सुरवात झाली वटवट्या पक्ष्याच्या पाच जाती आम्ही आठ दिवसात बघितल्या व त्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून आले

 अमोल डोंगरे. गाईड    
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vatvatya bird in nandurmadhmeshwar